भारतीय संघ (Team India) 28 ऑगस्ट (रविवार) रोजी आशिया चषकात (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडियाची नजर आहे. भारतीय संघाला या संघाविरुद्ध विजय मिळवायचा असेल, तर आघाडीच्या फळीला चांगली कामगिरी करावी लागेल. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, पण टीम इंडियाला या तिघांची चिंता आहे. खरे तर राहुल दुखापतीतून बऱ्याच दिवसांनी परतला आहे. झिम्बाब्वेमध्ये झालेल्या दोन सामन्यांमध्ये त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. त्याचबरोबर विराट कोहलीचा फॉर्म गेल्या दोन वर्षांपासून चांगला नाही. या कारणामुळे त्याने ब्रेकही घेतला. ब्रेकनंतर तो थेट पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) बोलायचे झाले तर तो नियमित खेळत असला तरी त्याचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम लाजीरवाणा आहे. त्याने आपला रेकॉर्ड सुधारला नाही तर टीम इंडिया अडचणीत येईल.
पाकिस्तानविरुद्ध दोनदा झाला बाद
रोहित शर्माची पाकिस्तानविरुद्ध टी-20मधील कामगिरी पाहता त्याने सात डावात केवळ 70 धावा केल्या. यावेळी त्याची सरासरी 14 झाली आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 30 आहे आणि स्ट्राइक रेट 127.27 आहे. तसेच तो दोन वेळा पाकिस्तानविरुद्ध शून्यावर बाद झाला आहे. रोहितने ज्या संघांविरुद्ध किमान पाच डाव खेळले आहेत, त्यापैकी पाकिस्तानविरुद्धचा त्याचा विक्रम सर्वात वाईट आहे.
श्रीलंका-ऑस्ट्रेलियापेक्षा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड खराब
पाकिस्ताननंतर रोहितने श्रीलंकेविरुद्ध 16 डावांत 21.19च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 डावांत 22.71च्या सरासरीने 318 धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधाराने श्रीलंकेविरुद्ध 118 धावांची खेळी खेळली आहे, परंतु त्याचा एकूण विक्रम सर्वोत्तम नाही. यावेळी आशिया चषकात त्याला पाकिस्तानविरुद्ध तसेच श्रीलंकेविरुद्ध विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. (हे देखील वाचा: Cheteshwar Pujara On Fire: पुजारा ने 75 बॉल मध्ये ठोकल शतक, Watch Video highlights)
गेल्या पाच वर्षांमध्ये रोहितचे T20 प्रदर्शन
वर्ष | मैच | रन | सरासरी |
2018 | 19 | 590 | 36.87 |
2019 | 14 | 396 | 28.28 |
2020 | 4 | 140 | 46.66 |
2021 | 11 | 424 | 38.54 |
2022 | 13 | 290 | 24.16 |
रोहितची मागील दोन वर्षांची कामगिरी आहे खराब
रोहितची गेल्या पाच वर्षांतील कामगिरी पाहता 2022 मधील त्याची सरासरी सर्वात कमी आहे. त्याने यावर्षी 13 सामन्यांच्या 13 डावात 24.16 च्या सरासरीने 290 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 140.09 होता. रोहितने अर्धशतक केले आहे.