विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत रोहित शर्मा मुंबई संघाकडून खेळणार
Rohit Sharma | File Photo | (Photo Credits- Twitter @ImRo45)

भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा हा मुंबईसाठी विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याची शक्यता आहे. भारताला एशिया कप जिंकून दिल्यानंतर रोहितला वेस्ट इंडिस विरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी वगळण्यात आलं आहे. ह्या निर्णयावर अनेक माजी खेळाडूंनी टीका केली होती. आणि आता एकदिवसीय मालिकेसाठी सराव मिळावा म्हणून रोहित मुंबईसाठी खेळणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या निवड समितीचा अध्यक्ष अजित अगरकरने ह्या बातमीला दुजोरा दिला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीच्या सामन्यासाठी ऑक्टोबर १० ला निवड होणार आहे. श्रेयस अय्यर सध्या मुंबईचं नेतृत्व करत असून पुढच्या सामन्यात पण तोच करणार आहे.