Rohit Sharma Apartments: कर्णधार रोहित शर्माला बांद्र्याच्या भाड्याच्या घरापोटी मिळणार महिन्याला मिळणार 3 लाख रुपये

25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत व्यस्त असून त्याआधी अपार्टमेंटसंदर्भात बातमी समोर आली आहे. रोहित शर्मानं बांद्रा (Rohit Sharma) येथील दोन अपार्टमेंट रेंटवर दिले आहेत. रोहित शर्माला प्रत्येक महिन्याला तीन लाख रुपयांचं भाडं मिळणार आहे. भाडेकरुसोबत रोहित शर्माने तीन वर्षांसाठी करार केलेला आहे. पहिल्यावर्षी प्रतिमहिना 3.1 लाख रुपये रेंट द्यावं लागणार आहे. तर दुसऱ्यावर्षी यामध्ये वाढ होऊन 3.25 लाख प्रतिमहिना आणि तिसऱ्या वर्षी 3.41 लाख प्रतिमहिना रेंट मिळणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

4 जानेवारी 2024 रोजी रोहित शर्मानं भाडेकरुसोबत अपार्टमेंटसाठी करार केला आहे.  रोहित शर्माला दोन अपार्टमेंटसाठी 9.3 लाख रुपयांचं डिपॉझिट मिळालं आहे. रोहित शर्मानं 14 व्या मजल्यावर 1047 स्क्वेअरफूट ( 616 आणि 431) इतकं मोठं अपार्टमेंट रेंटवर दिलं आहे.  दरम्यान, रोहित शर्माने 2022 मध्ये हीच दोन अपार्टमेंट प्रतिमहिना 2.5 लाख रुपयांनी भाड्याने दिलं होतं.