(Photo Credit: Arbaaz Khan/Twitter)

'स्विस किंग' रोजर फेडरर आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच यांच्यामधील विंबलडन 2019 मधील सामना ऑल इंग्लंड क्लबमध्ये सुरु आहे. आजचे विंबलडन ग्रँड स्लॅम जिंकता फेडरर आपल्या कारकिर्दीतील आठवे विंबलडन खिताब आपल्या नावावर करत इतिहास लिहील. फेडररसह भारताचा रवींद्र जडेजा देखील आयसीसी क्रिकेट विश्वचषकसाठी इंग्लंडमध्ये होता. पण सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या भेटीची चर्चा होऊ लागली आहे. पण, हे दुसरे कोणी नाही तर त्यांचे डोप्पेल्गेन्जर्स आहे. बॉलीवूड अभिनेता अरबाज खान यांच्या फेडररशी साम्य आहे, त्यासाठी तो चर्चेत देखील राहिला आणि त्याच्या आणि फेडररमधील सामन्यासाठी अनेक मिम्स देखील बनले आहे. (Wimbledon 2019: नोवाक जोकोविच विरुद्ध विंबलडन फायनल आधी रोजर फेडरर-अरबाज खान मिम्स सोशल मीडियावर वायरल)

अरबाजने ऍड शूटच्या दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो जडेजासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीसोबत दिसत आहे. रविवारी अरबाजने रवि रायकर याच्या सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याचे लांब केस वगळता रायकर पूर्णतः जडेजासारखा दिसतोय. फोटो शेअर करताना अरबाज ने लिहिले, "विचार करा वर्ल्ड कप सेमीफायनलनंतर कोण माझ्या सेटवर आलं". यावर नेटिझन्सने अंदाज लावला आणि त्याला 'गरिबांचा रोजर फेडरर' आणि 'गरिबांचा रवींद्र जडेजा' म्हणले.

 

View this post on Instagram

 

Guess who visited my film set post WC semi finals 😂😜🤦‍♂️ #doppelgänger #lookalike #uncannyresembelance @raviraikwar99

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial) on

दरम्यान, जडेजाच्या डॉपेलगेन्जरने अरबाजने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत त्याचे आभार मानले.