सचिन तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

Road Safety World Series 2021: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज (Road Safety World Series) मालिकेच्या आजपासूनरायपुरातील शहीद वीरनारायण स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघ आमने-सामने येतील. 5 मार्च ते 21 मार्च दरम्यान 6 संघ या मालिकेमध्ये भाग घेत आहेत. या मालिकेत भारत, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे खेळाडू सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिलेल्या खेळाडूंचा या मालिकेत समावेश करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), इरफान पठाण, युवराज सिंह यांच्यासारखे दिग्गज खेळाडू या सीरीजमध्ये खेळताना दिसणार आहेत. माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी रोड सेफ्टीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला असून मार्च 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम सुरू केला होता. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या उद्घाटन आवृत्तीची सुरुवात 20 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाली होती मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. (Road Safety World Series 2021: पूर्ण फिक्स्चर, सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या संपूर्ण 6 संघांबद्दल जाणून घ्या)

दरम्यान, आजच्या पहिल्या सामन्यात इंडिया लेजेंड्सचा पहिला सामना बांग्लादेश लेजेंड्स संघाशी होणार आहे. अशास्थितीत, या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागची जोडी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर सलामीला उतरेल. युवराज सिंह देखील सामन्यात मोठे फटके खेळण्यासाठी उत्सुक असेल. झहीर खान, प्रज्ञान ओझा, मुनाफ पटेल, इरफान पठाण यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले गोलंदाजही संघाकडून खेळताना दिसतील. दरम्यान, या बहुप्रतीक्षित मालिकेचे लाईव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंगचे अधिकार Viacom18 नेटवर्कला देण्यात आले आहे. कलर्स सिनेप्लेक्स, रिश्ते सिनेप्लेक्स आणि कलर्स चॅनेल अनेक भाषांमध्ये सामना लाईव्ह प्रक्षेपित करतील तर चाहते Voot आणि Jio TV अ‍ॅपवर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहू शकतात.

पहा असा आहे इंडिया लेजेंड्स संघ: सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, मोहम्मद कैफ, युसुफ पठाण, नमन ओझा, झहीर खान, प्रज्ञान ओझा, नोएल डेविड, मुनाफ पटेल, इरफान पठाण आणि मनप्रीत गोनी.