भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी रीवाबा जडेजाने (Rivaba Jadeja) भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आहे. गुजरातचे कृषीमंत्री आर. सी. फलदू (Agriculture Minister R C Faldu) आणि खासदार पूनम माडम (MP Poonam Madam) यांच्या उपस्थितीत रीवाबाने भाजपामध्ये प्रवेश केला.
रीवाबाने दिल्लीतून इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण घेतले असून ती करणी सेनेत कार्यरत होती. समाजसाठी चांगलं काहीतरी करण्याच्या उद्देशाने भाजपात प्रवेश केल्याचं रीवाबाने सांगितलं.
Jamnagar: Rivaba Jadeja, wife of cricketer Ravindra Jadeja joined BJP in presence of Gujarat Agriculture Minister R C Faldu and MP Poonam Madam earlier today. #Gujarat pic.twitter.com/d6GV1DM2Dv
— ANI (@ANI) March 3, 2019
एप्रिल 2016 मध्ये रीवाबा आणि रवींद्र जडेजा विवाहबद्ध झाले. जून 2017 मध्ये दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले.
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर अनेक कलाकार, सेलिब्रेटी विविध पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. त्यात आता रीवाबा जडेजाची देखील भर पडली आहे.