Rishabh Pant Test Ranking: आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर झाली आहे. ऋषभ पंत आणि सरफराज खान यांनी ताज्या कसोटी क्रमवारीत बरीच प्रगती केली आहे. सरफराजने मोठी झेप घेतली आहे. तर ऋषभ पंतने टॉप 10 फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याने टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीला मागे टाकले आहे. यशस्वी जैस्वालचा पहिल्या पाच नावात समावेश आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळला गेला. या सामन्यात सरफराज आणि ऋषभ यांनी दमदार कामगिरी केली होती. (हेही वाचा - IND vs NZ Pune Pitch Report: पाच वर्षांनी रोहित सेना उतरणार पुण्याच्या मैदानात, खेळपट्टीवर कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट )
आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये इंग्लंडचा रुट अव्वल स्थानावर आहे. तर भारताच्या तीन खेळाडूंचा टॉप 10 मध्ये समावेश आहे. यशस्वी जैस्वाल चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे 780 अंक आहेत. ऋषभ पंतने तीन स्थानांची झेप घेतली आहे. तो विराट कोहलीच्याही पुढे गेला आहे. पंतचे 745 अंक आहेत. कोहली आठव्या स्थानावर आहे. या तिघांव्यतिरिक्त टॉप 10 मध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.
सरफराज खानने 31 स्थानांची झेप -
सरफराजने न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत दमदार कामगिरी केली. त्याने दुसऱ्या डावात 150 धावा केल्या. याचा फायदा सरफराजला क्रमवारीत झाला आहे. तो आता संयुक्त 53 व्या स्थानावर पोहोचले आहेत. सर्फराजने कसोटी फलंदाजी क्रमवारीत 31 स्थानांनी झेप घेतली आहे. त्याच्या कारकिर्दीतील हे मोठे यश आहे.
कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत जडेजा अव्वल स्थानावर
कसोटीतील पुरुष अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अक्षर पटेल सातव्या स्थानावर कायम आहे. जसप्रीत बुमराह कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. अश्विन गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. जडेजा संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे.