विराट कोहली आणि संजू सॅमसन (Photo Credit: Twitter/@IPL)

RCB vs RR IPL 2021: आयपीएलच्या (IPL) 14 व्या सत्रात विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. सामन्याच्या सुरुवातीपूर्वी नाणेफेक दरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळाला. जे पाहून विराटसह सॅमसन आणि समलोचक Ian Bishop यांनाही हसू अनावर झाले. 7 वाजता नाणेफेक दरम्यान विराट कोहलीला नाणे फेकण्याची संधी मिळाली आणि संजू सॅमसनने हेड कॉल दिला. नंतर, जेव्हा मॅच रेफरीने नाणे पाहिले तेव्हा टेल आले असल्याचे आढळले आणि त्यांनी विराटला टॉसचा विजेता घोषित केले. याच वेळी गोंधळ झाला. विराट सहसा टॉस जिंकत नाही आणि सॅमसनने नाणेफेक जिंकली असे त्याला वाटले व मुलाखतीसाठी संजूला पुढे केले. (RCB vs RR IPL 2021 Match 16: बेंगलोरचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय, असे आहेत दोंघांचे प्लेइंग XI)

इतकंच नाही तर संजूदेखील पुढे आला, मात्र नंतर दोघांच्याही लक्षात आलं की टॉस विराटने जिंकला होता. यानंतर विराट माफी मागत पुढे आला आणि आपण पहिले क्षेत्ररक्षण करणार असल्याचं जाहीर केलं. विराटने केलेला गोंधळ पाहून फक्त आरसीबी कर्णधारचं नाही तर संजू आणि समलोचक Ian Bishop यांनाही हसू अनावर झालं. शिवाय, मुलाखतीसाठी पुढे आलेल्या विराटने म्हण्टलं की, त्याला टॉस जिंकण्याची सवय नाही, त्यामुळेच त्याच्याकडून ही गडबड झाली असं म्हणत विराटने घटनेवर मजेशीर प्रतिक्रिया दिली. दरम्यान, यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स विरोधात झालेल्या सामन्यात कोहलीने पहिल्यांदा इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गनविरुद्ध टॉस जिंकला होता. इंग्लंडच्या भारत दौऱ्यावरील मर्यादित मालिकेदरम्यान कोहली मॉर्गन विरोधात तब्बल 6 वेळा टॉस हरला होता. आयपीएल 2021 च्या चेन्नईतील 10 व्या संयत कोहलीने अखेर मॉर्गनविरुद्ध नाणेफेक जिंकली आणि यावेळी त्याला देखील आश्चर्य वाटले.

आयपीएलच्या 14 व्या हंगामात दोन्ही टीम्सच्या आजवरच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर आरसीबीने खेळलेल्या तीनही सामन्यात विजय मिळवला आहे तर राजस्थानला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला असून उर्वरित 2 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत देखील आरसीबी आघाडीवर असून राजस्थान तळाशी 7व्या क्रमांकावर आहे. अशास्थितीती राजस्थानपुढे आज बेंगलोरची विजय घोडदौड रोखण्याचे कठीण आव्हान आहे.