Virat Kohli ने IPL 2021 मधील पहिले अर्धशतक ‘या’ खास व्यक्तीला केले समर्पित, RCB कर्णधाराचे हे क्युट जेस्चर जिंकेल तुमचेही मन (Watch Video)
विराट कोहलीने आयपीएल 2021 मधील पहिले अर्धशतक मुलगी वामिकाला केले समर्पित (Photo Credit: Twitter)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ((Royal Challengers Bangalore) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये विजयाचा चौकार मारत आपली विजयरथ सुरु ठेवला आहे. राजस्थान रॉयल्सने दिलेले 178 धावांचे लक्ष्य संघाने 10 विकेट राखून गाठले. वानखेडे स्टेडियमवर मोसमातील पहिला खेळणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) संघाने राजस्थानच्या प्रत्येक गोलंदाजी चांगलीच धुलाई केली. पडिक्क्लने धावांचा पाठलाग करताना पुढाकार घेतला आणि अवघ्या 52 चेंडूत 101 धावा फटकावल्या. हंगामात उत्तम फॉर्मामध्ये असलेला कोहली देखील नाबाद राहिला आणि त्याने 47 चेंडूत 72 धावा केल्या. कोहलीने या मोसमातील पहिले अर्धशतक पूर्ण केल्यावर आपली मुलगी वामिकाला (Vamika) समर्पित केले. आरसीबी (RCB) व्यवस्थापनाने खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्याबरोबर राहण्याची परवानगी दिल्यामुळे कोहलीची पत्नी अनुष्का आणि मुलगी त्याच्यासोबत प्रवास करत आहेत. (RCB vs RR IPL 2021: Virat Kohli ने रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कमाल करणारा RCB कर्णधार ठरला पहिलाच फलंदाज!)

जानेवारी 2021 मध्ये अनुष्काने मुलगी वामिकाला जन्म दिला. भारतीय कर्णधार वामिकाच्या जन्मासाठी आपल्या पत्नीसमवेत राहण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरून कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळावर मायदेशी परतला होता. दरम्यान, आरसीबीने पॉइंट टेबलमध्ये पुन्हा अव्वल स्थान मिळवले आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यात विजयी ठरलेल्या आरसीबीच्या खात्यात 4 विजय आणि 8 गुण आहेत. त्यांनी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर अखेरच्या चेंडूवर विजयासह मोसमाची जबरदस्त सुरुवात केली होती. त्यानंतर आरसीबीने सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. संघ सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत आणि जोपर्यंत शक्य असेल तो अपराजित राहण्याचा प्रयत्न करेल.

दरम्यान, हंगामातील तिसर्‍या टप्प्यासाठी अहमदाबादला रवाना होण्यापूर्वी आरसीबी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आणखी एक सामना खेळेल. अहमदाबाद येथे चार सामन्यांनंतर आरसीबी कोलकाता येथे पोहचतील जिथे संघ अखेरचे पाच सामने खेळतील. दुसरीकडे, खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर आता आरसीबी संघ आयपीएल विजेतेपदाचा मुख्य दावेदार बनला आहे. ‘विराटसेना’ जर यंदा आयपीएल विजेतेपद पटकावण्यात यशस्वी झाली तर संघाचे ते पहिले चॅम्पियनशिप ठरेल.