काल (21 एप्रिल) बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी मैदानात (M. Chinnaswamy Stadium) रंगलेल्या चैन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरूद्ध रॉयल चैलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) सामन्यात बंगलोरने चेन्नईवर एका रनने विजय मिळवला. चेन्नईने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बंगलोर संघाने 162 धावांच लक्ष्य चेन्नई समोर ठेवले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कर्णधार धोनीने दमदार खेळी केली. धोनीने 84 धावा केल्या. याशिवाय शेन वॉटसन (5), फॉफ डु प्लेसिस (5), सुरेश रैना (0), केदार जाधव (09), अंबाती रायडू (29), रवींद्र जडेजा (11), ड्वेन ब्रावो (5) आणि शार्दूल ठाकुर (0) यांनी इतक्या धावांचे योगदान दिले. हरभजन सिंग याची बुलेट कॅच आणि इमरान ताहिर याच्या शिट्टीची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)
तर बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याला माघारी धाडण्यात दीपक चहर याला यश आले. इतकंच नाही तर विराटला बाद केल्याचा आनंद त्याने हटके हटके स्टाईलने व्यक्त केला. दीपक चहरच्या आनंदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाचा व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ:
🙌🙌#RCBvCSK pic.twitter.com/otJE909aWX
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2019
अटीतटीच्या या रंगलेल्या सामन्यात बंगलोरचा विजय झाला असून स्पर्धेतील हा बंगलोरचा हा तिसरा विजय ठरला आहे. तर चेन्नई सुपरकिंग्स 14 पाईंट्ससह स्पर्धेत अव्वल स्थानी आहे.