RCB (Photo Credit - X)

KKR vs RCB, IPL 2025 1st T20 Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 आजपासून सुरूवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट संघ (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट संघ (RCB) यांच्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने 7 गडी राखून केकेआरचा पराभव केला आहे. त्याआधी आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या केकेआरने आरसीबीसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसाबीने 16.2 षटकात तीन विकेट गमावून लक्ष्य गाठले.

रहाणेची बॅट गर्जली

कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 174 धावा केल्या. एकेकाळी केकेआरचा स्कोअर 9.5 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 107 धावा होता. तथापि, रहाणे आणि नरेन बाद होताच, केकेआरचे फलंदाज काहीही करू शकले नाहीत. कोलकाताकडून कर्णधार रहाणेने सर्वाधिक 56 धावा केल्या. नरेन 44 धावांची खेळी खेळली. दुसरीकडे, आरसीबीकडून स्टार अष्टपैलू कृणाल पंड्याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. कृणाल पंड्या व्यतिरिक्त जोश हेझलवूडने दोन विकेट घेतल्या.

साल्ट-विराटची स्फोटक खेळी

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीने, विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर 22 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 16.2 षटकांत तीन गडी गमावून 177 धावा केल्या. विराट कोहलीने 36 चेंडूत 59 धावा काढल्या आणि लियामने 5 चेंडूत 15 धावा काढल्या. केकेआरकडून वैभव, सुनील आणि वरुण यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.