रमीझ शहजाद आणि बेन स्टोक्स (Photo Credit: Twitter)

संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या 2020 टी-20 विश्वचषक च्या क्वालिफायर (World Cup Qualifier) सामन्यांमध्ये अद्याप इतके लोकप्रिय न झालेल्या देशांतील खेळाडूंनी लक्ष वेधले आहे. कधीकधी खेळाडूंचा डाव तर काहीवेळा त्यांचे क्षेत्ररक्षण चर्चेचा विषय बनत आहे. बुधवारी युएई (UAE) आणि स्कॉटलंड (Scotland) यांच्यात झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने 90 धावांनी मोठा विजय नोंदविला आणि टी-20 विश्वचषकमध्ये पहिल्यांदा स्थान नक्की केले. स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्से (George Munsey) याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला, पण सर्वात जास्त चर्चा होत आहे ती युएईच्या खेळाडूची. या मॅचमध्ये टीमचा अव्वल फळीतील फलंदाज रमीज शहजाद (Rameez Shahzad) याने एका हाताने पकडलेला झेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. टी-20 विश्वचषक पात्रता संघाच्या तिसऱ्या प्लेऑफ सामन्यात रमीझने शानदार झेल पकडला आणि स्कॉटिश फलंदाज जॉर्ज मुन्सीला पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. रमीझने ज्याप्रकारे हा कॅच पकडला तो पाहून इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने वनडे विश्वचषकमध्ये पकडलेल्या एका झेलची आठवण करून दिली. (IND vs SA 2nd Test Day 4: रिद्धिमान साहा याने झेलला Superman कॅच; चाहत्यांसह विराट कोहली देखील झाला अचंबित, पहा Video)

या सामन्यात स्कॉटलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जॉर्ज मुन्से आणि कर्णधार काइल कोएत्झर संघासाठी फलंदाजीस उतरले. मुन्सेने 42 चेंडूंत 65 धावा करत जोरदार फलंदाजी करत होता. अहमद रझा याच्या 14 व्या ओव्हरमधील दुसर्‍या बॉलवर मुन्सेने लाँग ऑफच्या दिशेने लांब शॉट खेळला. बॉल उंच हवेत होता आणि त्याच दरम्यान शहजादने डाव्या बाजूला धावत उंच उडी मारला आणि एका हाताने अद्भुत कॅच पकडला. शहजादने पकडलेला कॅच पाहून सर्व जण अचंबित झाले. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी विश्वचषकमध्ये स्टोक्सने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एका हाताने असाच झेल पकडला होता. पाहा या अद्भुत कॅचचा हा व्हिडिओ:

टी -20 वर्ल्ड कपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक तुलनात्मक व्हिडिओ शेअर करण्यात आला. याने रमीझच्या झेलची तुलना इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्सशी झाली. जेव्हा दोन्ही व्हिडिओ एकत्र पाहिले जातात तेव्हा त्यात फारसा फरक दिसत नाही. या झेलनंतर शहजादने युएईच्या डावादरम्यान 28 चेंडूंत 34 धावा केल्या पण त्याची कठोर परिश्रम संघाच्या कोणत्याही कामी आला नाही. स्कॉटलंडने युएईसमोर 199 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल युएईचा संघ 18.3 ओव्हरमध्ये केवळ 108 धावांवर बाद झाला.