Rameez Raja: विश्वचषकासाठी भारतात जाण्यावर रमीझ राजाने दिलं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले - 'पाकिस्तानशिवाय विश्वचषक कोण पाहणार?'
Rameez Raja (Photo Credit -Twitter)

Rameez Raja on ODI World Cup 2023: बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी अलीकडेच भारतीय क्रिकेट संघ (Team India) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) साठी पाकिस्तानला (Pakistan) जाणार असल्याची चर्चा फेटाळून लावली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चांगलाच हादरला होता. त्यावेळीही पीसीबी प्रमुख रमीझ राजा (Rameez Raja) यांनी आशिया चषक खेळण्यासाठी न आल्यास 2023 च्या वनडे विश्वचषकासाठी (ODI WC 2023) भारतात जाणार नाही, असे विधान केले होते. यासंदर्भात रमीझ राजा यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. यावेळीही त्यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला आणि असेही म्हटले की, पाकिस्तानशिवाय कोणी विश्वचषक पाहणार का?

पाकिस्तानशिवाय विश्वचषक कोण पाहणार?'

त्याचवेळी आता पुन्हा एकदा पीसीबी प्रमुखांनी आपल्या वक्तव्याची पुनरावृत्ती केली आहे. एका उर्दू मीडिया प्लॅटफॉर्मशी बोलताना ते म्हणाले, "पुढील वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तानने भाग घेतला नाही, तर ते कोण पाहणार? आमची स्पष्ट भूमिका आहे. जर भारतीय संघ इथे आला तर आम्ही विश्वचषकासाठी जावु. आणि जर ते आले नाहीत तर ते आमच्याशिवाय विश्वचषक खेळू शकतात. यावर आम्ही कठोर कारवाई करू." (हे देखील वाचा: Harbhajan Singh ने प्रशिक्षक Rahul Dravid बद्दल दिले मोठे वक्तव्य, या माजी खेळाडूला सांगितले सर्वोत्तम प्रशिक्षक)

आम्ही केलेली कामगिरी चांगली 

रमीझ राजा पुढे म्हणाले, "मी नेहमी म्हणत आलो की, आम्हाला पाकिस्तान क्रिकेटची अर्थव्यवस्था सुधारण्याची गरज आहे, आणि आम्ही चांगली कामगिरी केली तरच ते होऊ शकते. आमचा संघ कामगिरी दाखवत आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषकात आम्ही भारताला हरवले. टी-20 आशिया चषक स्पर्धेत आम्ही भारताला पराभूत केले. एका वर्षात पाकिस्तान क्रिकेट संघाने एक अब्ज डॉलर अर्थव्यवस्था असलेल्या संघाला दोनदा पराभूत केले आहे."