IPL trophy (Photo credit: X @IPL)

IPL Points Table 2025 Update: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग सुरू झाली आहे. आयपीएलमधील प्रत्येक सामन्यानंतर, सर्वांचे लक्ष पॉइंट्स टेबलवर असते. गुण आणि नेट रन रेट संघाच्या स्थानावर परिणाम करतात. या हंगामात, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दहा आयपीएल संघ ट्रॉफीसाठी लढत आहेत.

इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 11 वा सामना आज म्हणजेच 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स क्रिकेट टीम विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट टीम यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा सहा धावांनी पराभव करत पहिला विजय मिळवला आहे.

आयपीएल 2025 अपडेटेड पॉइंट्स टेबल:

डेटेड पॉइंट टेबल:

टीम सामना विजय पराभव टाय रनरेट गुण नेट रनरेट
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2 2 0 0 0 4 +2.266
दिल्ली कैपिटल्स 2 2 0 0 0 4 +1.320
लखनऊ सुपर जायंट्स 2 1 1 0 0 2 +0.963
गुजरात टायटन्स 2 1 1 0 0 2 +0.625
पंजाब किंग्ज 1 1 0 0 0 2 +0.550
कोलकाता नाइट रायडर्स 2 1 1 0 0 2 -0.308
चेन्नई सुपर किंग्ज 3 1 2 0 0 2 -0.771
सनरायझर्स हैदराबाद 3 1 2 0 0 2 -0.871
राजस्थान रॉयल्स 3 1 2 0 0 2 -1.112
मुंबई इंडियन्स 2 0 2 0 0 0 -1.163

 

आयपीएल 2025 मध्ये, पॉइंट्स टेबलवरील अव्वल चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. राउंड-रॉबिन लीग टप्पा संपल्यानंतर प्लेऑफचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होते. पॉइंट टेबलमधील अव्वल 4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील.