ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार रॅचेल हेन्सने (Rachael Haynes Retires) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यंदाचा महिलांचा बिग बॅश हंगाम ही तिची शेवटची स्पर्धा असेल. 2009 मध्ये पदार्पण करणाऱ्या 35 वर्षीय हेन्सला जगातील सर्वोत्तम महिला फलंदाजांपैकी एक मानले जाते. सहा कसोटी, 77 एकदिवसीय आणि 84 T20 सामने खेळणारी हेन्स सहा विश्वचषक विजेत्या संघांचा सदस्य होती. निवृत्तीची घोषणा करताना हेन्स म्हणाली, "माझ्या सर्व सहकारी खेळाडूंनी माझ्या कारकिर्दीत खूप साथ दिली. त्याच्यामुळेच मी आजवर खेळू शकले. माझ्या मित्रांनी मला दररोज अधिक चांगले काय तरी करण्याची नवी प्रेरणा दिली. मैदानावरील प्रत्येकाकडून मला खूप काही शिकायला मिळाले. एक खेळाडू म्हणून मला आव्हान मिळाले. मी माणूस म्हणून वाढायला शिकले. मुख्य म्हणजे संघातील खेळाडूंनी क्रिकेटची धमाल उडवून दिली.
महिला एकदिवसीय विश्वचषक 2017 दरम्यान हेन्सला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपदाची संधी मिळाली. त्यानंतर नियमित कर्णधार मेग लेनिंगला खांद्याच्या समस्येमुळे सामना खेळता आला नाही. त्यानंतर 2018 मध्ये हेन्सला उपकर्णधार बनवण्यात आले. त्या वर्षी आणि 2020 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकण्यात तिने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर हेन्सने 2022 च्या एकदिवसीय विश्वचषक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत संघासह सुवर्णपदक जिंकले.
Rachael Haynes retires having won it all 🙌 pic.twitter.com/e9UPz1oA0d
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 15, 2022
हेन्स 2010 आणि 2012 मध्ये टी-20 विश्वचषक आणि 2013 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होती. याशिवाय 2010-11, 2019, 2021-22 मध्ये अॅशेस मालिका जिंकणाऱ्या संघातही तिचा समावेश होता. हेन्सने तिन्ही फॉरमॅटमध्ये 167 सामन्यांत 3818 धावा केल्या आहेत. यामध्ये 2009 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी पदार्पणातील 98 धावांच्या संस्मरणीय खेळीचा समावेश आहे. (हे देखील वाचा: Asad Rauf Passes Away: पाकिस्तानी अम्पायर Asad Rauf यांचे निधन; वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख निक हॉकले म्हणाले: "ऑस्ट्रेलियाला इतिहासातील सर्वात यशस्वी क्रीडा संघ बनण्यात मदत करण्यात रॅचेलचा मोलाचा वाटा आहे. खेळातील महान खेळाडूंपैकी एक म्हणून तिचे नाव घेतले जाईल."