
Sunrisers Hyderabad vs Punjab Kings IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 27 वा सामना 12 एप्रिल (शनिवार) रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली, सनरायझर्स हैदराबादने सलग चार सामने गमावले आहेत आणि आता संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध फक्त एक सामना गमावून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड (SRH vs PBKS Head To Head Record In IPL)
आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात एकूण 23 सामने खेळले गेले आहेत. या काळात, सनरायझर्स हैदराबादने वरचढ कामगिरी केली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने 16 सामने जिंकले आहेत. तर, पंजाब किंग्जने फक्त सात सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते. या काळात सनरायझर्स हैदराबादने दोन्ही सामने जिंकले होते. पंजाब किंग्ज हा सामना जिंकून त्यांची आकडेवारी सुधारू इच्छितात.
आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे रेकाॅर्ड
सनरायझर्स हैदराबादचा घातक सलामीवीर अभिषेक शर्माला आयपीएलमध्ये 1500 धावा पूर्ण करण्यासाठी 72 धावांची आवश्यकता आहे.
सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला आयपीएलमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी 80 धावांची आवश्यकता आहे.
सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज कामिंदू मेंडिसला टी-20 क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी 62 धावांची आवश्यकता आहे.
सनरायझर्स हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला टी-20 क्रिकेटमध्ये 250 बळी पूर्ण करण्यासाठी दोन विकेट्सची आवश्यकता आहे.
सनरायझर्स हैदराबादचा घातक सलामीवीर फलंदाज नितीश रेड्डी याला आयपीएलमध्ये 500 धावा पूर्ण करण्यासाठी 85 धावांची आवश्यकता आहे.
पंजाब किंग्जचा घातक सलामीवीर प्रभसिमरन सिंगला टी-20 क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण करण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे.
पंजाब किंग्जचा स्टार फलंदाज नेहल वधेराला आयपीएलमध्ये 500 धावा पूर्ण करण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे.