Ruturaj Gaikwad And Kedar Jadhav (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग (MPL 2023) स्पर्धा 15 जूनपासून सुरु होत आहे. काही दिवसापूर्वी या लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 15 जूनपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेचा 29 जून रोजी समारोप होणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे (MCA Cricket Stadium, Pune) खेळले जातील. दरम्यान, पुणेरी बप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यात सलामीचा पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाची धुरा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या खांद्यावर आहे, तर कोल्हापूर टस्कर्स संघाची जबाबदारी केदार जाधव (Kedar Jadhav) याच्याकडे आहे. त्याआधी ओपनिंग सरेमनिचा कार्यक्रम रंगणार आहे. अमृता खानविलकर हिच्यासह अन्य कलाकार परफॉर्म करणार आहेत.

कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह

दरम्यान, हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे (MCA Cricket Stadium, Pune) खेळले जातील. तसेच लीगच्या पहिल्या हंगामातील सामने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये विनामूल्य पाहता येणार आहे. क्रिकेटप्रेमीना मोबाईल ॲप वरून महाराष्ट्र प्रिमियर लीग सामन्याचा आनंद घेता येणार आहे. फॅनकोड या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे. तसेच सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्टस या वाहिनीवर करण्यात येईल! डिश टीव्ही चॅनल नं. 640, एअरटेल चॅनल नं. 298, व्हिडिओकॉन चॅनल नं. 646, टाटा स्काय चॅनल नं. 453 आणि सन डायरेक्ट चॅनल नं. 302 या चॅनलवर तुम्ही सामने पाहु शकतात. (हे देखील वाचा: 2 Reviews in One Ball: एकाच चेंडूवर दोन डीआरएस, अंपायरच्या निर्णयानंतर अश्विनने घेतला दुसरा रिव्ह्यू; पहा पूर्ण व्हिडिओ)

पहा दोन्ही संघाचे खेळाडू

पुणेरी बाप्पा - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रोहन दामले, प्रशांत कोरे, अद्वय शिधये, अझहर अन्सारी, शुभंकर हर्डीकर, वैभव चौघुले, रोशन वाघसरे, पियुष साळवी, आदित्य डवरे, सौरभ दिघे, शुभम कोठारी, सोहन जमाले, साईश दिघे, सचिन भोसले, अभिमन्यू जाधव, यश क्षीरसागर, पवन शाह, श्रीपाद निंबाळकर, हर्ष संघवी, दिग्विजय पाटील, अजय बोरुडे, आदर्श बोथारा, भूषण नावंदे, कुंश दीक्षित, हर्ष ओसवाल, सूरज शिंदे.

कोल्हापूर टस्कर्स - केदार जाधव (कर्णधार), नौशाद शेख, कीर्तीराज वाडेकर, मनोज यादव, विद्या तिवारी, अत्मन पोरे, अक्षर दरेकर, श्रेयंश चव्हाण, सिद्धार्थ म्हात्रे, तरणजीत ढिल्लन, निहाल तुस्माड, रवी चौधरी, अंकित बावणे, सचिन धस, निखिल मदस, साहिल औताडे