Photo Credit-X

Priyank Panchal Retirement: भारतीय क्रिकेट संघ सध्या मोठ्या बदलांना अनुभवत आहेत. जिथे मोठे दिग्गज खेळाडू निवृत्ती जाहीर करत आहेत. त्यांच्या जागी नव्या पिढीला संधी मिळत आहेत. भारतीय संघ तरूणाला आजमावत आहे. त्यातच काल सोमवारी आणखी एका भारतीय खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) काही दिवसांपूर्वी निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) ने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आता प्रियांक पांचाळ (Priyank Panchal Retirement) याने काल 26 मे रोजी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधीन निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत प्रियांकने निवृत्ती घेत असल्याचे सांगितले.

क्रिकेटमध्ये 250 हून अधिक सामने खेळले-

2021 मध्ये प्रियांकची भारतीय संघात निवड झाली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहित शर्माला दुखापत झाल्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आले होते, पण प्रियांकला पदार्पणाची संधी मिळाली नाही. प्रियांक पांचाळने वयाच्या 35 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. प्रियांकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 8 हजारांहून अधिक धावा केल्या. सलामीवीर प्रियांकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 250 हून अधिक सामने खेळले आहेत.

निवृत्तीची घोषणा करताना प्रियांकची भावनिक पोस्ट-

निवृत्तीची घोषणा करताना प्रियांकने म्हणाला की, मोठे झाल्यावर, प्रत्येकजण त्यांच्या वडिलांकडे पाहतो, त्यांना आदर्श मानतो, प्रेरणा घेतो आणि त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो, मीही त्यापेक्षा वेगळा नव्हतो. माझे वडील माझ्यासाठी बराच काळ शक्तीचा स्रोत होते, माझ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी, तुलनेने लहान शहरातून उठून एक दिवस भारताची कॅप घालण्याची आकांक्षा बाळगण्याचे धाडस करण्यास त्यांनी मला ज्या प्रकारे प्रोत्साहन दिले ते पाहून मी भारावून गेलो आहे. ते खूप पूर्वी आम्हाला सोडून गेले पण प्रत्येक हंगामात, आजपर्यंत माझ्यासोबत त्यांचे स्वप्न बाळगले होते. मी, प्रियांक पांचाळ, प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर करतो. हा एक भावनिक क्षण आहे. हा एक समृद्ध क्षण आहे. आणि हा एक क्षण आहे जो मला अपार कृतज्ञतेने भरून टाकतो.