ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्यूज (Photo Credit: PTI)

Phillip Hughes 6th Death Anniversary: क्रिकेटच्या मैदानावर सामना दर सामना विक्रम मोडले आणि बनवले जातात. पण काही वेळा असं काही घडतं की ते एक दुर्दैवी घटना म्हणून कायम लक्षात राहते आणि आजच्या दिवशी सहा वर्षांपूर्वी असेच काहीसे घडले होते. 27 नोव्हेंबर, 2014 रोजी म्हणजे आजच्या दिवशी ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक क्रिकेट सामन्यात एका बाउंसरवर जखमी झालेल्या 25 वर्षीय युवा फलंदाज फिलिप ह्यूजचा (Phillip Hughes) दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज त्या घटनेला सहा वर्ष पूर्ण झाली असून त्या दिवसाची आठवण अद्यापही आणि कदाचित कायमची चाहते आणि खेळाडूंच्या लक्षात राहणारी आहे. Hughes 63 धावांवर फलंदाजी करीत असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याने अखेरचा श्वास घेतला. या दिवशी सोशल मीडियावर स्टिव्ह स्मिथ (Steve Smith), डेविड वॉर्नर (David Warner), माइकल क्लार्क यांच्यासह सहखेळाडू, आयपीएल फ्रँचायझी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी फलंदाजाची आठवण काढली.

“मी अजूनही आपली कॅप घालतो भाव, रोज तुझी आठवण येते,” क्लार्कने इन्स्टाग्रामवर लिहिले.

“तुझी आठवण येते ब्रूझ #408 63 नॉट आऊट,” स्टीव्ह स्मिथने लिहिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Steve Smith (@steve_smith49)

टीम इंडिया

दिल्ली कॅपिटल्स

क्रिकेट ऑस्ट्रेलिया

कधीच विसरला जाणार नाही

अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्स

नेपाळ क्रिकेट

डेविड वॉर्नर

(Photo Credit: Instagram)

वेगवान गोलंदाज सीन एबॉटच्या बाउंसर चेंडू फिलिप ह्यूजच्या मानेच्या भागावर आदळला. त्यावेळी फिलिप ह्यूजने हेल्मेट घातले होते, मात्र चेंडू लागल्यावर तो गंभीररीत्या जखमी झाला आणि त्वरित मैदानावरच आदळला. त्यानंतर सिडनीच्या एका हॉस्पिटलमध्ये ह्यूजने तीन दिवस मृत्यूशी झुंज दिली, पण अखेर 27 नोव्हेंबर रोजी झुंज अपयशी ठरली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे तीन दिवसानंतर, 30 नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस होता.