Champions Trophy 2025 (Photo Credit - X)

ICC Champions Trophy 2025 Pakistan:  चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे, परंतु . आयसीसीचे अधिकारी नुकतेच कराची, रावळपिंडी आणि लाहोरच्या मैदानांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यानंतरही वेळापत्रकाला मंजुरी न मिळाल्याने पीसीबीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता एका मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की पीसीबीने (PCB) आयसीसीला (ICC) शेड्यूलला अंतिम मंजुरी देण्याची विनंती केली आहे. (हेही वाचा - ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी आयसीसीने खेळला मोठा डाव, पाकिस्तानला दिला मोठा झटका; वाचा सविस्तर)

द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रस्तावित वेळापत्रकानुसार सामन्यांचे बुकिंग सुरू केले आहे. आयसीसी औपचारिकपणे याची पुष्टी करेल तेव्हाच वेळापत्रक निश्चित केले जाईल. काही अहवालांनुसार, पुढील महिन्याच्या अखेरीस आयसीसी अंतिम वेळापत्रकास मान्यता देऊ शकते, त्यानंतरच तयारीला अंतिम रूप दिले जाऊ शकते.

ऑक्टोबर महिन्यात या स्पर्धेच्या लॉजिस्टिकबाबत चर्चा होऊ शकते, असेही सांगण्यात आले. महिला T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यादरम्यान BCCI सचिव जय शाह आणि PCB चेअरमन मोहसिन नक्वी यांची भेट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही याचे स्पष्ट उत्तर भारताने अद्याप दिलेले नाही. अशा परिस्थितीत आयसीसी वेळापत्रक मंजूर करण्यास विलंब का करत आहे हे समजू शकते.

पीसीबीने पाठवलेल्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार, भारतीय संघाला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह अ गटात ठेवण्यात आले होते. ब गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानला स्थान देण्यात आले आहे. प्रस्तावित वेळापत्रकानुसार पुढील वर्षी 19 फेब्रुवारीला स्पर्धा सुरू होणार असून अंतिम सामना 9 मार्चला होणार असून 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.