Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 07 ऑक्टोबरपासून मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात 37 षटकांत सहा गडी गमावून 152 धावा केल्या आहे. पाकिस्तान संघ अजूनही इंग्लंडपेक्षा 115 धावांनी मागे आहे. पाकिस्तन सध्या पराभवाच्या छायेखाली असून इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यात विजयासाठी अवघ्या 4 विकेटची गरज आहे. यामुळे आजचा दिवस हा या सामन्यातसाठी महत्त्वाचा दिवस ठरु शकतो. (हेही वाचा - ICC World Test Championship: डब्ल्यूटीसीच्या इतिहासात 'या' कर्णधारांना आजपर्यंत एकही जिंकता आला नाही सामना, यादीत एका भारतीय कर्णधाराचाही समावेश )
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस कधी खेळला जाईल?
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता मुलतानच्या मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. (हेही वाचा:IND vs BAN 2nd T20 2024 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या )
थेट सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा
भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण होणार नाही. तथापि, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांना पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाचा आनंद घेता येईल.
पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघांपैकी 11 खेळाडू:
पाकिस्तान संघ: शान मसूद (कर्णधार), सौद शकील, सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, आमिर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद.
इंग्लंड संघ: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर.