पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी पाकिस्तानचा दुसरा डाव संकटात आलेला दिसत आहे. पाकिस्तानने आतापर्यंत दुसऱ्या डावात 21 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 81 धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडे 93 धावांची आघाडी आहे. बांगलादेशकडून नाहिद रैना तीन विकेट घेतल्या असून हसन महमूदने 2 विकेट तर तास्किन अहमदकडून एक विकेट घेतली आहे. पाकिस्तानकडून कर्णधार शान मसूदने सर्वाधिक 28 धावांची खेळी केली आहे. सध्या मोहम्मद रिजवान हा 16 धावांवर खेळत आहे. (हेही वाचा - Pakistan vs Bangladesh, 2nd Test Day 3 Stumps Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने दोन गडी गमावून 9 केल्या धावा, बांगलादेशने केले शानदार पुनरागमन; पहा स्कोअरकार्ड)
पाहा पोस्ट -
Nahid Rana gets his third, claiming the wicket of Saud Shakeel!💥
PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/VTGPqbnVQZ
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 2, 2024
पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 274 धावा केल्या. बांगलादेशची प्रत्युत्तरात 6 बाद 26 अशी नाजूक स्थिती झाली होती. मात्र लिटन दास आणि मेहदी हसन मिराज याने तसं होऊ दिलं नाही.या दोघांनी खऱ्या अर्थाने मॅच फिरवली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी बांगलादेशच्या डावातील टर्निंग पॉइंट ठरला. बांगलादेशला पहिल्या डावात 78.4 ओव्हरमध्ये 262 धावा करता आल्या.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मीर हमजा आणि मोहम्मद अली.
बांगलदेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद आणि नाहिद राणा.