![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/22-187.jpg?width=380&height=214)
पीसीबीकडून 11 फेब्रुवारी रोजी कराची येथील नूतनीकरण केलेल्या नॅशनल बँक स्टेडियमचे (National Bank Stadium) अनावरण करण्यात येणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्यांच्या आयोजनासाठी गेल्या काही महिन्यांत या जागेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये पीसीबीच्या (Pakistan Cricket Board) प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांसाठी जागतिक दर्जाचे ड्रेसिंग रूम आहेत, ज्यामध्ये उच्च दर्जाचे हॉस्पिटॅलिटी रूम आहेत. नॅशनल बँक स्टेडियममध्ये एकूण 350 एलईडी लाईट्स, 5,000 नवीन खुर्च्या आणि दोन रिप्ले स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत." नॅशनल बँक स्टेडियमच्या उद्घाटन समारंभात अली जफर, शफकत अमानत अली आणि साहिर अली बग्गा सारखे पाकिस्तानचे अव्वल संगीतकार सादरीकरण करतील.
नॅशनल बँक स्टेडियमचे अनावरण
Newly-look National Bank Stadium to be unveiled today
Details here ⤵️ https://t.co/VsiEjpm9vr
— PCB Media (@TheRealPCBMedia) February 11, 2025