Pakistan Coach Jason Gillespie Pick Water Bottles Video:   पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना रावळपिंडीत खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे आणि 24 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शेवटच्या कसोटीपूर्वी, खेळाडू रावळपिंडी स्टेडियममध्ये घाम गाळत आहेत. दरम्यान, काही फोटो समोर आली आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी मैदानात कचरा आणि बाटल्या गोळा करताना दिसत आहेत.  (हेही वाचा  -  Pakistan vs England 3rd Test 2024 Playing 11: अंतिम कसोटीसाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन जाहीर, फिरकी गोलंदाजांवर दिला भर; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11 )

हे फोटो प्रशिक्षण सत्रानंतर घेण्यात आली होती, जिथे खेळाडूंनी पाणी आणि इतर पेयाच्या बाटल्या वापरल्यानंतर मैदानावर फेकल्या होत्या. जेसन गिलेस्पी त्याच बाटल्या गोळा करताना दिसत आहे. या कामाबद्दल क्रिकेट चाहते या ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे खूप कौतुक करत आहेत. अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्याच संघातील खेळाडूंबद्दल संताप व्यक्त केला आणि असे म्हटले की, प्रशिक्षक हे त्यांच्या नम्र स्वभावाचे प्रतीक आहे.

पाहा पोस्ट -

पाकिस्तानचा संस्मरणीय विजय 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला एक डाव आणि ४७ धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. शान मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचा हा सलग सहावा पराभव ठरला. कसोटी सामन्यातील या लाजिरवाण्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापनाने बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर वगळले. अशा परिस्थितीत पाकिस्तानने दुसरी कसोटी 152 धावांनी जिंकून पराभवाची मालिका संपवली.

तिसरा कसोटी सामना निर्णायक ठरेल, ज्यामध्ये दोन्ही संघ विजयासाठी आपले सर्वस्व पणाला लावणार आहेत. एकीकडे, इंग्लंडने अंतिम सामन्यासाठी दोन बदल केले आहेत, जिथे ब्रायडन कार्स आणि मॅथ्यू पॉट्सच्या जागी गस ऍटकिन्सन आणि रेहान अहमद खेळतील. पाकिस्तान संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.