Pakistan National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, Tri-Series 2025 Final Match 2025:  पाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिकेचा (Pakistan ODI Tri-Series, 2025) अंतिम सामना आज म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या मालिकेत मोहम्मद रिझवान पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरकडे आहे. न्यूझीलंडने लीगमध्ये खेळलेले दोन्ही सामने जिंकून तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला हरवले तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला हरवले.

पाहा पोस्ट -

तत्पूर्वी, तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 16 धावांवर बसला.

संपूर्ण पाकिस्तान संघ 49.3 षटकांत 242 धावांवर ऑलआउट झाला.

दुसरीकडे, विल्यम ओ'रोर्कने न्यूझीलंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. न्यूझीलंडकडून विल्यम ओ'रोर्कने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. विल्यम ओ'रोर्क व्यतिरिक्त, मायकेल ब्रेसवेल आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला 50 षटकांत 243 धावा कराव्या लागतील.

पहिल्या डावातील धावफलक:

पाकिस्तान फलंदाजी: 242/10, 49.3 षटकांत (फखर जमान 10 धावा, बाबर आझम 29 धावा, सौद शकील 8 धावा, मोहम्मद रिझवान 46 धावा, सलमान आघा 46 धावा, तैयब ताहिर 38 धावा, खुशदिल शाह 7 धावा, फहीम अश्रफ 22 धावा, शाहीन आफ्रिदी 1 धाव, नसीम शाह 19 धावा, अबरार अहमद नाबाद 1 धाव)

न्यूझीलंड गोलंदाजी: (जेकब डफी 1 बळी, विल्यम ओ'रोर्क 4 बळी, मायकेल ब्रेसवेल 2 बळी, नॅथन स्मिथ 1 बळी आणि मिशेल सँटनर 2 बळी).