Photo Credit- X

PAK vs ENG 2nd Test, Multan Weather & Pitch Report: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडमध्ये आज दुसरा कसोटी सामना 15 ऑक्टोबरपासून मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या कसोटीत शान मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला इंग्लंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्या पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेट संघातील मतभेद आणखीनच वाढले. त्यामुळे निवड समितीने संघात बदल केले आहेत. परिणामी बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह या खेळाडूंना दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले गेले आहे. दरम्यान, पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीदरम्यान मुलतानचे हवामान कशी भूमिका बजावेल हे जाणून घेऊयात. (हेही वाचा: ENG vs PAK 2nd Test 2024 Day 1 Live Streaming: दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला हरवून पराभवाचा बदला घेणार पाकिस्तान संघ; सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या)

हवामान आहवाल

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड 2री कसोटी 2024 मध्ये हवामानाचा फारसा हस्तक्षेप अपेक्षित नाही. पहिल्या कसोटीप्रमाणे मुलतानमध्येही उष्णता अपेक्षीत आहे. तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र असेल.

मुलतान क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी अहवाल

मुलतान क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांना, विशेषतः इंग्लंड आणि पाकिस्तानच्या फलंदाजांना धावा करणे सोपे जाईल. पहिल्या कसोटीत वापरलेली खेळपट्टी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीसाठी वापरली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाने तीन फिरकीपटू ठेवले आहेत.