PAK vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ तडाखेबाज ओपनिंग फलंदाजापुढे पाकिस्तान संघ निरुत्तर, कसोटी क्रिकेटमध्ये केली आहे अशी कमाल जो कोणी करू शकला नाही
डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

PAK vs AUS Test 2022: तब्बल 24 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Australia Cricket Team) पाकिस्तान दौऱ्यावर (Pakistan Tour) पोहोचली आहे. 4 मार्चपासून दोन्ही सामन्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. आणि कांगारू संघातील बहुसंख्य सहकाऱ्यांप्रमाणे डेविड वॉर्नर (David Warner) त्याच्या 13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रथमच पाकिस्तानमध्ये पोहोचला आहे, परंतु तो एक प्रख्यात आणि गोलंदाजांमध्ये भीती निर्माण केलेला फलंदाज आहे. कारण वॉर्नरचा पाकिस्तानविरुद्ध कसोटी विक्रम (Waner vs PAK Test Record) उल्लेखनीय आहे. वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या पुढील कसोटी प्रतिस्पर्ध्या विरोधात सात सामन्यांमध्ये पाच शतके करणारा एकमेव सलामीवीर आहे आणि पाकिस्तानविरुद्ध 100 किंवा त्याहून अधिक (108.40) सरासरीने एलिट स्तरावर पाचपेक्षा जास्त डाव खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. अशाप्रकारे पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरचा रेकॉर्ड यजमान संघाला नक्कीच सावधानतेचा इशारा देतो. (PAK vs AUS: पाकिस्तान दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाज अॅश्टन अगरला जीवे मारण्याची धमकी)

35 वर्षीय ताफाखेबाज सलामी फलंदाजाने मागील पाच डावांमध्ये 144, 113, 55, 154 आणि नाबाद 335 धावा चोपल्या आहेत. याशिवाय इंग्लंडविरुद्ध अखेर खेळलेला वॉर्नर अ‍ॅशेस मालिकेत फारशी कमाल करू शकला नाही. ब्रिस्बेन येथे 94 आणि अडिलेड येथे 95 धावा वगळता वॉर्नर अन्य सामन्यांत स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघातून आराम देण्यात आला होता. त्यामुळे तब्बल एक महिन्याने मैदानात परतणारा वॉर्नर धावा करण्यासाठी उत्सुक असेल. पण वॉर्नरसाठी हे सर्व सोप्पे नसेल, कारण तो यावेळी तो वेगळ्या खेळपट्टीवर खेळणार असून त्याची त्याला अधिक सवय नाही आहे. त्यामुळे कदाचित त्याला सुरुवातीला संघर्ष करावा लागू शकतो, पण एकदा कांगारू फलंदाजाने लय मिळवल्यास तो पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्ला चढवण्यास सक्षम आहे.

उल्लेखनीय आहे की वॉर्नरला पाकिस्तानविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेतून वगळण्यात आले आहे. वॉर्नर तीन सामन्यांच्या मालिकेत उस्मान ख्वाजा याच्यासोबत सलामीला उतरेल. तर मर्यादित षटकांची मालिका वॉर्नर खेळणार नसला तरी तो आयपीएल च्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमांमुळे दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केलेल्या वॉर्नरला काही सामन्यांसाठी बाहेर बसावे लागणार आहे.