क्रिकेट चाहत्यांना बर्याचदा सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्कृष्ट कामगिरी, उत्तम झेल, सर्वोत्तम विकेट्स आणि मैदानात पाहिलेले सर्व शानदार क्षण आठवतात. पण, क्रिकेटच्या मैदानात असेही काही क्षण असतात जे कधीही न विसरणे खेळाडूंना कठीण जाते. न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) च्या दुसर्या कसोटी सामन्याच्या हॅमिल्टनमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात असाच एक क्षण पाहायला मिळाला जेव्हा इंग्लंडचा क्रिकेटपटू जो डेन्ली (Joe Denly) याने 'खेळाच्या इतिहासामधील सर्वात सोप्पा झेल' काही टाकला. न्यूझीलंड आणि इंग्लंडमधील 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यावर, इंग्लंड दुसरा सामनाही जिंकू शकले नाही. रॉस टेलर (Ross Taylor) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) सामन्याच्या अंतिम दिवशी टेलर आणि विल्यमसन क्रीजवर टिकून राहिलेआणि इंग्लंडचा विजय हिसकावून घेतला. टेलरने 105 धावा केल्या तर विल्यमसनने 104 धावांची नाबाद खेळी केली. पण, मॅचमध्ये असे काहीतरी घडले ज्याने सर्वांना चकित केले. सामन्यात असे काहीतरी घडले ज्याने सर्वांना चकित केले. इंग्लंडला विल्यमसनच्या विकेटची आवश्यकता होती आणि डेन्लीने केनचा सर्वात सोप्पा कॅच सोडलेला पाहून सर्वांनाच धक्का बसला. (NZ vs ENG: जोफ्रा आर्चर याच्या जातीय टिप्पणी विवादात नवीन वळण, घटने मागे इंग्लिश मॅन असल्याचा प्रेक्षकांचा दावा)
जोफ्रा आर्चर याने टाकलेल्या बॉलवर विल्यमसनने मिड विकेटवर शॉट खेळला. डेन्लीविल्यमसनच्या सर्वात जवळ होता. विल्यमसनने मारलेला चेंडूडेन्लीच्या अगदी हातात आला, पण त्याने तो ड्रॉप केला ज्याला पाहून आर्चरलाही काय प्रतिक्रिया देऊ कळेनासे झाले. विल्यमसन 62 धावांवर असताना डेन्लीने त्याचा कॅच सोडला. पाहा व्हिडिओ:
Test match up for grabs and Joe #Denly does this 😂
Have you ever seen a worse drop catch? #NZvENGpic.twitter.com/appDbqDJ29
— Odds.com.au (@OddsComAu) December 3, 2019
डेन्लीने जर विल्मसनचा तो झेल पकडला असता तर इंग्लंडने मॅचमध्ये पुनरागमन केले असते. विल्मसनने नंतर इंग्लंडला संधी दिली नाही आणि अखेरीस सामना ड्रॉ झाला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 375 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने कर्णधार जो रूट याच्या 226 धावांच्या प्रभावी खेळीने पहिल्या 476 धावा केल्या. सामना वाचवण्यासाठी न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करायची गरज होती. कर्णधार विल्यमसन आणि टेलरने संघाचा डाव हाताळला आणि सामना ड्रॉ करत मालिका 1-0 ने जिंकली.