New Zealand Women vs Sri Lanka Women, 15th Match Live Playing XI Update: 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा 15 वा सामना आज म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाईल खेळले जात आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. व्हाइट फर्न्ससाठी हा सामना महत्त्वाचा असेल, ज्यांना त्यांच्या मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. न्यूझीलंडने त्यांचा शेवटचा सामना 60 धावांनी गमावल्याने त्यांचा नेट रन रेट (NRR) -0.050 झाला. दरम्यान, श्रीलंकेला त्यांच्या निराशाजनक विश्वचषक मोहिमेचा शेवट विजयासह करायचा आहे. स्पर्धेतील 15 व्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चामारी अथापथुने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या रोमांचक सामन्यात दोन्ही संघ या दिग्गजांसह मैदानात उतरले आहेत.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), लेह कॅस्परेक, ली ताहुहू, रोझमेरी मायर, ईडन कार्सन
Sri Lanka Women won the toss and opted to bat first.
Here are the playing XIs of both teams.#ChamariAthapaththu #SophieDevine #NZvSL #NZvsSL #NZWvSLW #NZWvsSLW #T20WorldCup2024 #WomensT20WorldCup2024 #Cricket #SBM pic.twitter.com/doBMm66U0m
— SBM Cricket (@Sbettingmarkets) October 12, 2024
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: विशामी गुणरत्ने, चामरी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, नीलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), सचिनी निसानसाला, अमा कांचना, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शिनी, उदेशिनी प्रदीपिनी