PC-X

New Zealand National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd T20I Series 2025: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा टी 20 सामना 18 मार्च रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6.45 वाजता ड्युनेडिनमधील युनिव्हर्सिटी ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंड संघाने पाकिस्तानचा नऊ विकेट्सने पराभव केला. यासह यजमान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता पाकिस्तान संघ मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करू इच्छितो. तर किवी संघ हा सामना जिंकून 2-0 अशी आघाडी घेण्यासाठी पर्यत्न करेल. या मालिकेत न्यूझीलंडचे नेतृत्व मायकेल ब्रेसवेल करत आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व सलमान अली आगा करत आहेत.

युनिव्हर्सिटी ओव्हल, डुनेडिन खेळपट्टीचा अहवाल

युनिव्हर्सिटी ओव्हलमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ अनेकदा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. जेणेकरून ध्येय गाठण्यासाठी अनुकूल परिस्थितीचा फायदा घेता येईल. युनिव्हर्सिटी ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली असेल. पण खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

हेड टू हेड रेकॉर्ड

न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघ टी-20 मध्ये 45 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानचा वरचष्मा दिसतो. पाकिस्तानने 45 पैकी 23 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 20 सामने जिंकले आहेत. यावरून पाकिस्तान संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येते. पण किवी संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकतो. तथापि, प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारतो. लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नसेल.

युनिव्हर्सिटी ओव्हल स्टेडियमवरील टी20 सामन्यांची आकडेवारी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्युनेडिनमधील युनिव्हर्सिटी ओव्हलमध्ये आतापर्यंत एकूण 7 टी-20 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 2 वेळा विजय मिळवला आहे.

युनिव्हर्सिटी ओव्हल येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या: 165

युनिव्हर्सिटी ओव्हल येथे दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या: 149

युनिव्हर्सिटी ओव्हलमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या न्यूझीलंडने केली आहे. पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 7 विकेट गमावून 224 धावा केल्या. याशिवाय, श्रीलंकेने या मैदानावर सर्वात कमी धावसंख्या केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेचा संघ 141 धावांवर गारद झाला.

युनिव्हर्सिटी ओव्हलमध्ये सर्वाधिक धावा आणि विकेट्स कोणाच्या आहेत?

युनिव्हर्सिटी ओव्हलमध्ये न्यूझीलंडच्या फिनले ह्यू ऍलनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. फिन ऍलनने एका टी-20 सामन्यात 137 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. या मैदानावर फिन ऍलनची सरासरी 137 आहे. याशिवाय युनिव्हर्सिटी ओव्हलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या अॅडम फ्रेझर मिल्नेच्या नावावर आहे. अॅडम मिल्नेने 1 टी 20 सामन्यात 5.20 च्या सरासरीने 5 विकेट्स घेतल्या आहेत.