भारत वि न्यूजीलैंड (Photo Credits: BCCI/Twitter)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test Match Day 3 Live Streaming:   न्यूझीलंडने कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा 25 धावांनी पराभव केला. मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने 235 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 263 धावा केल्या. दुसऱ्या डावात संपूर्ण संघ 121 धावांवर आटोपला. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. अशाप्रकारे न्यूझीलंडने मुंबई कसोटी 25 धावांनी जिंकली. तर न्यूझीलंडकडून एजाज पटेलने सर्वाधिक ६ विकेट घेतल्या.

न्यूझीलंडने पहिली कसोटी 8 गडी राखून जिंकली. दुसरी कसोटी 113 धावांनी जिंकली. यानंतर तिसरा आणि शेवटचा सामना 25 धावांनी जिंकला.  (हेही वाचा  -  Virat Kohli Flop Show: विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच, मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावातही चाहत्यांची निराशा )

पाहा पोस्ट -

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासमोर विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य होते. छोट्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अनेकवेळा फसला. संघाने कर्णधार रोहित शर्माची पहिली विकेट 13 धावांवर गमावली, त्यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया थांबली नाही. भारताने अवघ्या 29 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. हतबल झालेल्या टीम इंडियाला अखेर पराभवाला सामोरे जावे लागले.

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 121 धावांवर ऑलआऊट झाली. यादरम्यान ऋषभ पंतने भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 64 धावा केल्या. या काळात संघाच्या एकूण आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही.