
Rohit Sharma Captaincy: आयपीयल IPL 2025 च्या हंगामात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अनेक अपयशाना सामोर जावं लागला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात संघाने खेळलेल्या सहा सामन्यापैकी केवळ दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्याआधारावर संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबई संघाचे चाहते प्रचंड निराश आहेत. रोहित शर्माला (Rohit Sharma) पुन्हा कर्णधार करण्याची मागणी चाहत्यांकडून वाढत आहे. नुकत्याच मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) या साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत (Shirdi) आल्या होत्या. त्यांना पाहताच मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्याने नीता अंबानी थेट मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलण्याची मागणी केली.
शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी लोक उभे होते. येताना रांगेत उभ्या असलेल्या एका चाहत्याने, “मॅडम, रोहित शर्माला कॅप्टन करा” अशी विनंती केली. त्याने ही मागणी करताच. नीता अंबानींनीही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. नीता अंबानी यांनी स्मितहास्य करत अत्यंत शांतपणे फक्त “बाबा की मर्जी” अस उत्तर दिल. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात सहा पैकी चार सामने गमावले असून, हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोहित शर्माने पाच वेळा मुंबईला विजेतेपद मिळवून दिल्यामुळे त्याला परत कर्णधारपद देण्याची जोरदार मागणी सर्वांकडून होत आहे.