Photo Credit- X

Indian Womens Under 19 National Cricket Team vs Bangladesh Womens Under 19 National Cricket Team: आयसीसी अंडर 19 महिला टी20 विश्वचषक 2025 चा सुपर सिक्सचा सहावा सामना आज म्हणजेच 26 जानेवारी रोजी भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश महिला (IND vs BAN) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे खेळला गेला. भारतीय संघाने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. या सामन्यात टीम इंडीयाने नाणेफेक जिंकली होती. त्यामुळे संघ प्रथम गोलंदाजीसाठी उतरला. (India Women U19 vs Bangladesh Women U19 Toss Update: टीम इंडीयाने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करणार, येथे पहा सामन्याचे स्कोअरकार्ड)

गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत बांगलादेशच्या सर्व फलंदाजांना आऊट केले. सर्वधीक विकेट वैष्णवी शर्माने घेतल्या. वैष्णवी शर्माने 3 विकेट घेतल्या. तर, बांगलादेशकडून सर्वाधिक धावा सौम्या एख्तर हिने केल्या. भारताने गट सामन्यातील सर्व सामने जिंकले आणि गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे, बांगलादेश संघानेही आतापर्यंत संमिश्र कामगिरी केली आहे. बांगलादेशने ग्रुप डी मध्ये 3 पैकी 3 सामने जिंकले आणि पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिले.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारत महिला संघ: जी. कमलिनी (यष्टीरक्षक), निकी प्रसाद (कर्णधार), गोंगाडी त्रिशा, सानिका चालके, भाविका अहिरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्हीजे, शबनम एमडी शकील, पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा, दृथी केसरी, आनंदिता किशोर, सोनम यादव

बांगलादेश महिला संघ: झुआरिया फिरदौस (यष्टीरक्षक), सुमाया अख्तर (कर्णधार), सुमाया अख्तर, फहोमिदा चोया, सादिया इस्लाम, आफिया आशिमा, जन्नतुल मौआ, सादिया अख्तर, हबीबा इस्लाम पिंकी, निशिता अख्तर निशी, अनीसा अख्तर सोबा, मोसममत. इवा, फारिया अख्तर, फरजाना इस्मिन, अरविन तानी, माहरुन नेस्सा