ICC Cricket World Cup 2023: मुंबई की कोलकाता, कुठे होणार टीम इंडियाचा उपांत्या फेरीचा सामना? शेवटच्या क्षणी बदलू शकते ठिकाण
Team India (Photo Credit - Twitter)

वर्ल्ड कप 2023 मधील (ICC Cricket World Cup 2023) उपांत्य फेरीची शर्यत खूपच तीव्र झाली आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर उर्वरित 2 जागांसाठी 6 संघांमध्ये लढत होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने मुंबईतील वानखेडे आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपला सामना कुठे खेळणार आहे हे जाणून घेऊया. (हे देखील वाचा: Angelo Mathews Timed Out: अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाइम आऊट होणारा ठरला पहिला फलंदाज, जाणून घ्या नियम)

टीम इंडियाचा उपांत्या फेरीचा सामना कुठे होणार?

भारतीय संघाच्या सलग 8 विजयांसह, गट टप्प्यात प्रथम क्रमांकाचा संघ म्हणून स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी वानखेडे, मुंबई येथे होणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला आपला उपांत्य सामना मुंबईत खेळायचा आहे. पण जर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आणि चौथ्या स्थानावर राहिला तर टीम इंडियाच्या सामन्याचे ठिकाण बदलले जाईल.

पाकिस्तानमुळे बदले जावू शकते ठिकाण

पहिल्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी होईल. चौथ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे. पाकिस्तान जर चौथ्या क्रमांकावर राहिला तर त्याचा सामना भारताशी होईल. अशात हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

आयसीसीने घेतला होता हा मोठा निर्णय 

2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका खेळण्यावरही बंदी घालण्यात आली होती आणि पाकिस्तानी खेळाडूंना मुंबईत उतरण्यास बंदी घालण्यात आली होती. अशा परिस्थितीत, स्पर्धेच्या सुरुवातीलाच हे ठरले होते की जर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचला असेल, तर त्याचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होईल, मग ते टेबलमध्ये कोणतेही स्थान असले तरीही.