
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad, 33rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा (IPL 2025) 33 वा सामना आज म्हणजेच 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात, मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) खांद्यावर आहे. आतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
हेड टू हेड रेकाॅर्ड (MI vs SRH Head to Head Record)
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकूण 23 सामने खेळले गेले आहेत. या काळात, मुंबई इंडियन्सने वरचढ कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाने 13 सामने जिंकले आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादने फक्त 10 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते. या काळात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला.
हे देखील वाचा: Mumbai vs Hyderabad Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि हैदराबादची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, येथे पाहा आकडेवारी
आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
मुंबई इंडियन्सचा घातक फलंदाज रोहित शर्माला आयपीएलच्या इतिहासात वानखेडे स्टेडियमवर 100 षटकार पूर्ण करण्यासाठी एका षटकाराची आवश्यकता आहे.
मुंबई इंडियन्सचा घातक फलंदाज सूर्यकुमार यादवला वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या इतिहासात 50 षटकार पूर्ण करण्यासाठी चार षटकारांची आवश्यकता आहे.
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला टी-20 क्रिकेटमध्ये 300 बळी पूर्ण करण्यासाठी चार विकेट्सची आवश्यकता आहे.
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयपीएलच्या इतिहासात एमआयचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनण्यासाठी पाच विकेटची आवश्यकता आहे.
सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला आयपीएलच्या इतिहासात एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे.
सनरायझर्स हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला आयपीएलच्या इतिहासात 100 बळी पूर्ण करण्यासाठी एका विकेटची आवश्यकता आहे.