MS Dhoni: भाजपच्या प्रदेश कार्यालयाला नोटीस पाठवल्यानंतर झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाची नजर आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या हरमू निवासस्थानावर आहे. झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने धोनीच्या हरमू येथील निवासस्थानी न्यूबर्ग सुप्रटेक (पॅथॉलॉजी सेंटर) लॅब उघडण्याच्या तयारीच्या माहितीवर तपास सुरू केला आहे. ते धोनीला नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे. (Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने महिला क्रिकेटमध्ये रचला इतिहास, तुफानी खेळीने मोडला विश्वविक्रम)
व्यावसायिक वापर सूचना
महेंद्रसिंग धोनीच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य सरकारने त्याला निवासी भूखंड दिला होता. आता या भूखंडाचा उपयोग न्युबर्ग सुपरटेक (पॅथॉलॉजी सेंटर) लॅब उघडण्यासाठी केला जात आहे. या भूखंडाचा व्यावसायिक वापर केल्यास हाऊसिंग बोर्डाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होईल. बोर्डाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल. त्याआधी झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळ याप्रकरणी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही नोटीस पाठवू शकते.
हाऊसिंग बोर्डाच्या जमिनीवर बांधलेल्या घरांमध्ये व्यावसायिक उपक्रम चालवणाऱ्या सुमारे तीनशे जणांना नोटिसा देण्यात आल्याचेही संजय लाल पासवान यांनी सांगितले. ज्या गृहनिर्माण मंडळाचे भूखंड किंवा ज्या घरांमध्ये व्यावसायिक उपक्रम चालवले जात आहेत त्यांचे वाटप रद्द करण्याच्या सूचनाही बोर्डाच्या एमडी आणि सचिवांना देण्यात आल्या आहेत.