रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

Most Runs in 2021: क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये वर्षभर आपली लय कायम ठेवणे कठीण असते विशेषतः कोरोना काळात खेळाडूंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खूप कमी फलंदाजांना एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 मध्ये चांगली कामगिरी करता आली. यामध्ये भारताचा (India) स्टार सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) या वर्षी सर्व फॉरमॅटमध्ये चमकला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सुरु झालेली टीम इंडियाची (Team India) विजयी घोडदौड आता दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. वर्ष 2021 मध्ये भारतीय संघात अनेक बदल झाले पण एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा हिट तर विराट कोहली (Virat Kohli) तीनही फॉरमॅटमध्ये फ्लॉप ठरला. रोहितसाठी यंदाचे वर्ष खूप चांगले गेले. (IND vs SA 1st Test Day 4: वर्ष संपले, खेळ संपला! Virat Kohli पुन्हा अपयशी, आता 2022 मध्ये पुन्हा मिळेल 71 व्या शतकाची संधी)

त्याने पहिले ऑस्ट्रेलियात आणि नंतर इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात स्वतःला सिद्ध केले. तो या वर्षातील टॉप क्लास क्रिकेटर ठरला. याशिवाय शर्मा हा व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये भारतीय वनडे आणि टी-20 कर्णधार तर कसोटी क्रिकेटमध्ये तो उपकर्णधार बनला आहे. रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये यावर्षी 11 सामन्यात सर्वाधिक 906 धावा लुटल्या तर टी-20 मध्ये तितक्याच सामन्यात 424 धावा केल्या आहेत. तसेच शर्मा यंदा तीन वनडे सामने खेळला ज्यामध्ये मिळून त्याला 90 धावाच करता आल्या. अशाप्रकारे रोहितने यावर्षी तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 1,420 धावा केल्या आहेत. रोहितच्या मागे या यादीत युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतने यावर्षी एकूण 1074 धावा करून दुसरे स्थान पटकावले. पंतने 12 कसोटी सामन्यात भारतासाठी 748 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलायचे तर त्याच्यासाठी यंदाचे वर्ष विस्मरणीय ठरले.

विराट कोहली यावर्षी टी-20 संघाचा कर्णधार म्हणून पायउतार झाला. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपदही काढून घेण्यात आले. तसेच फलंदाज म्हणूनही विराट यावर्षी काही विशेष कमाल करू शकला नाही. विराट कोहली सलग दुसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यात अपयशी ठरला. त्याने यावर्षी 11 कसोटी सामन्यात एकूण 536 धावा केल्या. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 10 टी-20 सामन्यात त्याने 4 अर्धशतकांसह एकूण 299 धावा केल्या. विराटने यावर्षी तीन एकदिवसीय सामने खेळला आणि 129 धावा केल्या. अशाप्रकारे त्याने तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 964 धावा केल्या ज्या विराट सारख्या दर्जेदार खेळाडूसाठी फारच कमी आहे.