Mohammad Nabi (Photo Credit - X)

ICC Latest ODI Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताजी क्रमवारी (ICC ODI Ranking) जाहीर केली आहे. यावेळी सर्वात मोठा बदल वनडेमधील अष्टपैलूंच्या क्रमवारीत दिसून आला आहे. बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन नंबर वनच्या मुकुटापासून वंचित राहिला आहे. शाकिब अल हसन गेली 5 वर्षे वनडेमध्ये नंबर-1 अष्टपैलू खेळाडू राहिला. पण आता एका 39 वर्षीय खेळाडूने त्याच्याकडून हा मुकुट हिसकावून घेतला आहे. अफगाणिस्तानचा महान खेळाडू मोहम्मद नबी वनडेचा नवा नंबर-1 अष्टपैलू खेळाडू बनला आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 3rd Test: रोहित शर्मा तिसऱ्या किसोटीत करु शकतो मोठी कामगिरी, 'या' मोठ्या विक्रमाच्या जवळ)

वास्तविक, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मोहम्मद नबीने या मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. या खेळामुळे तो आता नंबर-1 वनडे अष्टपैलू खेळाडू बनला आहे. नबी 314 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर साकिब आता एका स्थानाने घसरून दुसऱ्या स्थानावर आला आहे. शाकिब अल हसनचे रेटिंग गुण 310 आहेत.

मोहम्मद नबीने दाखवली दमदार कामगिरी

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या मालिकेत अफगाणिस्तानचा संघ 0-2 ने पिछाडीवर आहे. मात्र मोहम्मद नबीने आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यात मोहम्मद नबीने 130 चेंडूंचा सामना करत 136 धावांची खेळी केली होती. या कालावधीत त्याने 15 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचबरोबर या मालिकेत त्याने आतापर्यंत 1 बळीही आपल्या नावावर केला आहे.

मोहम्मद नबीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

मोहम्मद नबीने अफगाणिस्तानसाठी आतापर्यंत 3 कसोटी, 158 एकदिवसीय आणि 115 टी-20 सामने खेळले आहेत. या कसोटीत त्याने 33 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, एकदिवसीय सामन्यात त्याने 26.97 च्या सरासरीने 3345 धावा केल्या आहेत आणि 163 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, टी-20 मध्ये मोहम्मद नबीने 22.60 च्या सरासरीने 1967 धावा आणि 88 विकेट्स घेतल्या आहेत.