Mithali Raj Records: महिला क्रिकेटची सुपरस्टार मिताली राजचे हे जबरदस्त रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य
भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज (Photo Credit: Facebook)

Mithali Raj Records: भारतीय महिला कसोटी आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राजने (MithalI Raj) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते स्थान मिळवले आहे, जे पुरुष क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मिळवले आहे. इंग्लंड दौऱ्यावर तिसऱ्या वनडे सामन्यात मितालीने नाबाद 75 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडची माजी फलंदाज चार्लट एडवर्ड्सच्या (Charlotte Edwards) सर्वाधिक धावांच्या विक्रम मागे टाकले. एडवर्ड्सने यापूर्वी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 10,273 धावांची नोंद केली होती. 1999 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी डेब्यू केलेल्या मितालीचा क्रिकेट प्रवास रेकॉर्ड्सने परिपूर्ण आहे. मितालीने 21 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत विक्रमांची भडीमार केला आहे. यामध्ये असे अनेक रेकॉर्डस् आहे ज्यांना मोडणे जवळजवळ अशक्यच असेल. मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मास्टर-ब्लास्टर सचिननंतर दोन दशकाहून अधिक वर्ष क्रिकेटचे नेतृत्वात करणारी फलंदाज आहे. (Mithali Raj on Criticism: भारतीय संघाची कर्णधार मिताली राजचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, म्हणाली- ‘मला लोकांच्या प्रमाणीकरणाची गरज नाही’)

1. मितालीने 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आणि वयाच्या 16 वर्ष 205 दिवशी शतकी खेळी करारी महिला व पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात युवा फलंदाज आहे.

2. 12 जुलै 2017 रोजी ब्रिस्टल एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात ती भारतीय महिला संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरली. महिला क्रिकेटमध्ये 6000 धावा करणारी ती पहिली फलंदाज आहे. तसेच फॉरमॅटमध्ये पहिल्या दहा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये 50 च्या सरासरीने धावा करणारी मिताली एकमेव खेळाडू आहे.

3. 12 मार्च 2021 रोजी लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सामन्यात तिने आणखी एक विक्रम नोंदविला. 14 मार्च 2021 रोजी मिताली महिला क्रिकेटच्या वनडे सामन्यात 7000 धावा करणारी पहिली फलंदाज बनली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात तिने हा कारनामा केला होता.

4. मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एडवर्ड्सनंतर 10,000 धावांचा टप्पा पार करणारी भारताची पहिली तर एकूण फक्त दुसरी महिला क्रिकेटर आहे.

5. मितालीने 2002 इंग्लंड दौऱ्यावर टॉन्टन येथे आजवरची सर्वाधिक 214 धावांची खेळी केली होती. भारतीय महिला क्रिकेटरने केलेले हे एकमेव दुहेरी शतक असून महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही चौथे सर्वोच्च वैयक्तिक धावा आहे.

6. मितालीने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 6015 धावा केल्या आहेत. या प्रकरणात ती दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची चार्लट एडवर्ड्स तिच्या पुढे आहे. एडवर्ड्सने कर्णधार म्हणून सर्वाधिक 6,728 धावा केल्या आहेत.

मिताली राजच्या कारकीर्दीला आता 21 वर्षे पूर्ण झाली असून दोन दशकाहून अधिक काळ खेळणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. मितालीच्या जीवनावर आधारित 'शाबाश मिथू'चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू मिताली राजची भूमिकेत दिसणार आहे.