मिताली राज (Photo Credit: PTI)

Mithali Raj International Retirement: भारताची वनडे आणि कसोटी कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मितालीने ट्विट केले, “तुमच्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद! मी तुमच्या आशीर्वाद आणि समर्थनासह माझ्या दुसऱ्या डावाची सुरुवात करत आहे.” मितालीने बुधवारी दुपारी याची घोषणा केली आहे. यासह मितालीने तिच्या 23 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ब्रेक लावला. 39 वर्षीय मिताली राजने 8 जून रोजी ट्विटरवर एक दीर्घ संदेश जारी करून निवृत्तीची घोषणा केली. मितालीने तिच्या मेसेजमध्ये लिहिले की, “जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता, गेली 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.” (Team India: भारतीय महिला करणार श्रीलंका, इंग्लंड दौरा; राष्ट्रकुल खेळांपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवा वनडे कर्णधार, पाहा कोणाची दावेदारी)

“मला मिळालेल्या सर्व पाठिंब्याबद्दल मी BCCI आणि श्री जय शाह सर (मानद सचिव, BCCI) यांचे आभार मानू इच्छिते - प्रथम एक खेळाडू म्हणून आणि नंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून.” मिताली राजने 7 एकदिवसीय शतके आणि 1 कसोटी शतकांसह तिची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवली. तसेच भारताची दिग्गज फलंदाजांपैकी एक कसोटीमध्ये मितालीने 4 अर्धशतके झळकावली, तर वनडेमध्ये 64 अर्धशतके आणि टी-20 मध्ये 17 अर्धशतके झळकावली. मिताली 2017 च्या महिला विश्वचषकात एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आणि इंग्लंडची माजी फलंदाज शार्लोट एडवर्डसला मागे टाकले. मिताली राजच्या नेतृत्वाखाली, भारत 2017 महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला जेथे त्यांना हेदर नाइटच्या इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला.

दरम्यान मितालीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मितालीला शुभेच्छा दिल्या. “एक अद्भुत कारकीर्द संपुष्टात येते! मिताली राज, भारतीय क्रिकेटमधील तुमच्या अतुलनीय योगदानाबद्दल धन्यवाद. मैदानावरील तुमच्या नेतृत्वामुळे राष्ट्रीय महिला संघाला गौरव प्राप्त झाला आहे. मैदानावरील या शानदार खेळीबद्दल अभिनंदन आणि पुढील डावासाठी शुभेच्छा!” शाह यांनी लिहिले.

मिताली केवळ आतापर्यंतची सर्वाधिक सामने खेळणारी भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणूनच नाही तर महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 333 सामने खेळून 10,868 धावा केल्या आहेत. अर्जुन पुरस्कार विजेती आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त मितालीने 1999 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी पदार्पण केले आणि पुढील 2 दशकांमध्ये सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक बनली. कर्णधार म्हणून, मितालीने भारताला 2015 आणि 2017 या दोन विश्वचषकांच्या अंतिम फेरीत नेले.