
Rajasthan Royals vs Chennai Super Kings: राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) मधील डबल हेडरचा दुसरा सामना 30 मार्च (रविवार) रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांमध्ये असे खेळाडू आहेत. जे एकमेकांसाठी समस्या निर्माण करू शकतात आणि सामन्याच्या निकालावर परिणाम करू शकतात. या सामन्यात अनेक मनोरंजक 'मिनी लढाया' पाहायला मिळतील, ज्यामुळे खेळाचा उत्साह आणखी वाढेल.
संजू सॅमसन विरुद्ध खलील अहमद
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत संमिश्र कामगिरी आहे. त्याने काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत. पण संघ आता त्याच्याकडून अधिक सातत्याची अपेक्षा करेल. या हंगामात राजस्थानची फलंदाजी कमकुवत दिसत असल्याने, सॅमसनची कामगिरी खूप महत्त्वाची असेल. पण त्याला चेन्नई सुपर किंग्जचा फॉर्मात असलेला वेगवान गोलंदाज खलील अहमदच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
खलीलने या हंगामात सुरुवातीच्या काळात अनेक विकेट्स घेतल्या आहेत. जर खलीलने त्याचा स्विंग आणि वेग योग्यरित्या वापरला तर तो संजूला लवकर बाद करू शकतो आणि चेन्नईला मोठी आघाडी मिळवून देऊ शकतो.
ध्रुव जुरेल विरुद्ध नूर अहमद
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज ध्रुव जुरेल या हंगामात संघातील सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याने कठीण परिस्थितीत त्याच्या संघासाठी धावा केल्या आहेत. तो फिनिशरची भूमिका बजावत आहे. या सामन्यात त्याचा सामना चेन्नईचा मुख्य फिरकी गोलंदाज नूर अहमदशी होईल. जो मधल्या षटकांमध्ये फलंदाजांना अडकवण्यात तज्ज्ञ आहे.
या हंगामात नूर अहमदने आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना खूप त्रास दिला आहे. तो गुगली आणि स्लोअर बॉलने फलंदाजांना फसवतो आणि विकेट घेण्यातही पटाईत आहे. फिरकी गोलंदाजांविरुद्ध सहसा आक्रमक दृष्टिकोन बाळगणाऱ्या ध्रुव जुरेलला नूर अहमदच्या गोलंदाजीचा सामना करणे सोपे जाणार नाही.