MI vs SRH IPL 2021 Match 9 Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामना लाईव्ह कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या सर्वकाही
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

MI vs SRH IPL 2021 Match 9 Live Streaming: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 मोसमातील नववा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर (MS Chidambaram Stadium) रंगणार आहे. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स संघाने चेन्नईच्या खेळपट्टीवर मागील दोन्ही गमावले आहेत आणि संघ 150 पेक्षा कमी धावांचे लक्ष्य पूर्ती करण्यात संघ अपयशी ठरला आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) तिसऱ्या तर हैदराबाद आठव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमधील चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणारा आयपीएलचा (IPL) 9वा सामना आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल तर टॉस अर्धातासपूर्वी, 7.00 वाजता होईल. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातील आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. (IPL 2021: एका आयपीएल मोसमात 300 पेक्षा अधिक धावा व हॅट्रिक घेणारा Mumbai Indians चा ‘हा’ तडाखेबाज फलंदाज एकमेव क्रिकेटर, नाव जाणून विश्वास बसणार नाही)

रोहित शर्माची ‘पलटन’आणि डेविड वॉर्नरच्या ‘ऑरेंज आर्मी’ने चेपॉकवर खेळलेल्या मागील दोन्ही दोन्ही सामने खेळले आहेत. मुंबईने 2 सामन्यांपैकी एका सामन्यात पराभव तर एका सामन्यात विजय मिळवला आहे तर दुसरीकडे हैदराबादला आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे, त्यामुळे हैदराबादचा संघ विजयी सुरुवात करण्यास उत्सुक असेल. हैदराबादचे गोलंदाज शानदार बोलिंग करत आहेत मात्र आतापर्यंत फलंदाजांनी निराशा केली आहे तर मुंबईकडून मागील सामन्यात गोलंदाज विशेषतः राहुल चाहरने प्रभावी बॉलिंग केली होती. अशास्थितीत आजच्या सामन्यात दोन्ही संघांना आपल्या 11 खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

पहा मुंबई आणि हैदराबाद संघ

मुंबई इंडियन्सः रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, जेम्स नीशम, नॅथन कोल्टर-नाईल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, आदित्य तरे, अ‍ॅडम मिल्ने, क्रिस लिन, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंह, क्विंटन डी कॉक, अनुकुल रॉय, मोहसिन खान, अर्जुन तेंडुलकर, मार्को जानसेन आणि युधवीर सिंग

सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), केन विल्यमसन, मनीष पांडे, विराट सिंह, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिचेल मार्श, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जॉनी बेअरस्टो, रिद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, बासिल थंपी, जेसन होल्डर, जगदीशा सुचित, केदार यादव आणि मुजीब उर रहमान.