आयपीएलच्या (IPL 13) तेराव्या हंगामातील 48व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ एकमेकांशी भिडणार आहेत. शेख जायद मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. या हंगामात मुंबई आणि बेंगलोरच्या संघाने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. आयपीएल गुणतालिकेत मुबंईचा अव्वल स्थानी आहेत. तर, बेंगलोरचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमाकांवर असणाऱ्या संघाला अधिक फायदा मिळतो. यामुळे मुंबईचा संघ अव्वल स्थानी कायम राहण्यासाठी तर, बेंगलोरचा संघ दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामुळे उद्याचा सामना ड्रीम 11 (Dream11) वर गेम खेळणाऱ्या सर्वांसाठीच महत्वाचा ठरणार आहे. आजच्या सामन्यात कोणकोणत्या खेळाडूंची निवड करणे योग्य ठरेल? यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.
सघ्या अनेकांमध्ये ड्रीम 11 गेमचे वेड पाहायला मिळत आहे. यामुळे कोणता खेळाडू आपल्याला अधिक गुण मिळवून देईल? याकडे अधिक लक्ष दिले जाते. उद्याचा सामना मुंबई आणि बेंगलोरच्या संघात पार पडणार आहे. दोन्ही संघातील खेळाडू सध्या फॉर्म मध्ये दिसत आहे. यामुळे ड्रीम 11 मध्ये अकरा खेळाडूंची निवड करणे थोडे कठिण होणार आहे. तर, या सामन्यात अधिक गुण मिळवून देण्याची शक्यता असलेले खेळाडू कोणकोणते जाणून घेऊया. हे देखील वाचा- How to Download Hotstar & Watch SRH Vs DC Live Match: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
खेळाडू-
यष्टीरक्षक- क्विंटन डिकॉक, एबी डिव्हिलियर्स
फलंदाज- सुर्यकुमार यादव, विराट कोहली, देवदत्त पेडिकल
अष्टपैलू खेळाडू- हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, वॉशिन्टन सुंदर
गोलंदाज- जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद सिराज
कर्णधार- क्विंटन डिकॉक, उपकर्णधार- विराट कोहली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमिअर लीग यंदा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. या हंगामात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने चांगली कामगिरी बजावली आहे. यामुळे यंदाची स्पर्धा कोणता संघ जिंकले? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.