How to Download Hotstar & Watch SRH Vs DC Live Match: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
DC vs SRH (Photo Credits-File Image)

SRH Vs DC, 47th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 47व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ (Sunrisers Hyderabad Vs Delhi Capitals) आज एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्टीय मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाचे नेतृत्व डेव्हिड वार्नर (David Warner) करत आहेत. तर,दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे कर्णधार पद श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) संभाळत आहे. तसेच आजचा सामना हैदराबादच्या संघासाठी महत्वाचा ठरणार आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- SRH Vs DC, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत-

- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.