केएल राहुल आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 42व्या सामन्यात आज (28 सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (Mumbai Indians Vs Panjab Kings) आज आमने-सामने येणार आहेत. शेख जायद मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करीत आहे. तर, पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी के एल राहुल (K L Rahul) संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, सायंकाळी 7 वाजता टॉस होईल. तसेच 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यातील आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.

Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यातील आयपीएलचा 40वा सामना लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Disney+ Hotstar डाउनलोड करू शकतात. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाईव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे देखील वाचा- IPL 2021: तळाशी बसलेल्या SRH चा खेळ अद्याप बाकी, 9 पैकी 8 सामने गमावल्यानंतरही आहे प्लेऑफच्या शर्यतीत, जाणून घ्या समीकरण

मुंबई इंडियन्स संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, अॅडम मिल्ले, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, पियुष चावला, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, आदित्य तारे, ख्रिस लिन, नॅथन कुल्टर-नाईल, जयंत यादव, रूश कलारिया, जेम्स नीशम, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, अर्जुन तेंडुलकर, मार्को जॅन्सेन, युधवीर सिंग

पंजाब किंग्ज संघ:

केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, एडन मार्कम, निकोलस पूरन, दीपक हुडा, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोईस हेनरिक्स, आदिल रशीद, मनदीप सिंग , ख्रिस जॉर्डन, जलज सक्सेना, मुरुगन अश्विन, सरफराज खान, फॅबियन एलन, शाहरुख खान, सौरभ कुमार, इशान पोरेल, उत्कर्ष सिंह, दर्शन नळकांडे, प्रभुसिमरन सिंह