MI vs KXIP, IPL 2020: केएल राहुल, मयंक अग्रवालसाठी मुंबई इंडियन्सचा ‘प्लॅन’ तयार, किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध मुकाबल्यापूर्वी कोच शेन बॉन्डने केला खुलासा
केएल राहुल, मयंक अग्रवाल (Photo Credit: PTI)

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल मुकाबल्यापूर्वी केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांच्या सलामी जोडीसाठी चार वेळा आयपीएल चॅम्पियनचा प्लान तयार असल्याचे बॉलिंग कोच शेन बाँड यांनी सांगितले.पंजाबचे दोन्ही सलामी फलंदाजांनी आजवरच्या स्पर्धेत जबरदस्त फॉर्म दर्शवला आहे. राहुल आणि मयंक दोघेही आतापर्यंत स्पर्धेत लयीत दिसले आणि स्पर्धेत एक-एक शतकी डाव खेळला आहे. पंजाब आणि मुंबई यांच्यात गुरुवारी जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. पण त्या सामन्यापूर्वी मुंबईच्या तयारीविषयी बोलताना बाँड म्हणाले की, “केएल राहुलने यापूर्वी आमच्याविरुद्ध धावा केल्या आहे, तो एक हुशार खेळाडू आहे. तो एक डायनॅमिक खेळाडू आहे आणि त्याने सर्व मैदानावर धावा केल्या आहेत. पण आम्हाला माहित आहे की तो मधल्या ओव्हरमध्ये आपला वेळ घेतो. त्यामुळे आमच्याविरुद्ध खेळीत जर तो इतका दूर गेला तर आपण त्याच्यावर दबाव निर्माण करण्याची ही संधी असेल. शेवटी आम्ही त्याला धावा करण्यास परवानगी देऊ शकत नाही जिथे तो मजबूत आहे.”

पंजाब सलामी फलंदाज खासकर राहुलवर दबाव आणू शकतो असे सांगून बाँडने मुंबईच्या 'दर्जेदार' गोलंदाजीवरही प्रकाश टाकला. मुंबई सध्या युएईच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे काम करीत आहे. बॉण्ड म्हणाले, “मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही येथील वातावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत आहे. दुबई किंवा अबुधाबीत जुने विक्रम काय सांगतात हे सध्या महत्त्वाचं नसून लवकरात लवकर वातावरणाशी दोस्ती करणं आवश्यक आहे.”

दरम्यान, गतविजेत्या मुंबई इंडियन्सची योजनेप्रमाणे हंगामाची सुरुवात झाली नाही. त्यांनी खेळलेल्या 3 पैकी एका सामन्यात विजय मिळवला असून गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, पंजाबनेही आजवर फक्त एक सामना जिंकला आहे परंतु फक्त रन रेटमुळे ते चौथ्या स्थानावर आहेत. आणि आता गुरुवारी होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवून लयीत परतण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, पंजाबने त्यांच्या मागील दोन सामन्यात दोनशेहून अधिक धावा केल्या, तर मुंबईने मागील सामन्यात बेंगलोरने दिलेले 201 धावांचे लक्ष्य गाठून सामना बरोबरीत रोखला होता. पण मुंबईला सुपर ओव्हरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.