दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Photo Credit: File Image)

MI vs DC, IPL 2020 Qualifier 1: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 चा हंगाम आता आपल्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहचला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएलचा पहिला क्वालिफायर खेळला जाईल. आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बसलं केले आहेत, तर दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल झालेला नाही. आजच्या सामन्यातील विजयी संघ थेट फायनलमध्ये पोहचेल, तर पराभूत झालेल्या संघाला दुसऱ्या क्वालिफायरयामध्ये आणखी एक संधी मिळेल. आयपीएलच्या (IPL) गुणतालिकेत मुंबई इंडियन्स अव्वल स्थानावर असून दिल्लीने दुसरे स्थान पटकावले आहे. (MI vs DC, IPL 2020 Qualifer 1 Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएलचा पहिला क्वालिफायर लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

आजच्या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि जेम्स पॅटिन्सनचा समावेश केला असून धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, जेम्स पॅटिन्सन यांना बाहेर केले आहेत. रोहित शर्मा पुन्हा एकदा फिट झाल्याने क्विंटन डी कॉकस याच्यासोबत डावाची सुरुवात करेल. दुसरीकडे, मुंबईचा सामना करताना दिल्लीवर दबाव असेल कारण यंदाच्या स्पर्धेत चार वेळा आयपीएल विजेत्या संघाने दिल्लीचा दोन्ही वेळा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. आजच्या सामन्यासाठी दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही. शिखर धवनसह पृथ्वी शॉ डावाची सुरुवात करेल, तर मागील सामन्यात यंदाचे पहिले अर्धशतक ठोकणाऱ्या अजिंक्य रहाणेने तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल.

पाहा मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, नॅथन कोल्टर-नाईल आणि राहुल चाहर.

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, मार्कस स्टोइनिस, डॅनियल सॅम्स, अक्षर पटेल,  रविचंद्रन अश्विन, एनरिच नॉर्टजे आणि कगिसो रबाडा.