मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

MI vs DC, IPL 2020: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), आयपीएलच्या (IPL) गुणतालिकेतील दोन अव्वल संघांमधील हाय-वोल्टेज सामना थोड्याच वेळात सुरु होईल. मुंबई आणि दिल्लीमधील आजचा सामना अबू धाबी येथे शेख झायद स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाणेफेक जिंकली आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात दिल्लीचा विजयी रथ रोखून मुंबईचे लक्ष गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याकडे असेल तर दिल्ली आपली विजयी घोडदौड कायम ठेवू पाहत असतील. मुंबई इंडियन्स सध्या 6 सामन्यातील 4 विजय आणि 2 पराभवासह गुणतालिकेत दुसऱ्या तर 6 पैकी 5 सामन्यात विजय आणि एका सामन्यात विजय मिळवून पहिल्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यासाठी दोन बदल केले असून मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल झालेला नाही. (MI vs DC, IPL 2020 Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल झाले आहेत. रिषभ पंतला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले असून त्याच्या जागी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शिमरॉन हेटमायरच्या जागी अ‍ॅलेक्स कॅरीला (Alex Carey) संधी मिळाली आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉवर कॅपिटल्सला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. दुसरीकडे, डी कॉक आणि रोहित शर्माची जोडी पुन्हा एकदा एमआयच्या डावाची सुरुवात करेल. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. मधल्या फळीत  ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड आणि कृणाल पांड्या जबाबदारी सांभाळतील. ट्रेन बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सनसह जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजी विभाग मजबूत करतील. कृणाल पांड्या आणि राहुल चाहर दिल्लीला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील.

पाहा मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रोहित शर्मा (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, राहुल चाहर, जेम्स पॅटिनसन, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्कस स्टोईनिस, अक्षर पटेल, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, रविचंद्रन अश्विन आणि एनरिच नॉर्टजे.