Maharashtra Day 2019: मुंबई इंडियन्स संघाकडून 'महाराष्ट्र दिना'च्या खास शुभेच्छा (Watch Videos)
Mumbai Indians team (Photo Credits: IPL Facebook Page)

Maharashtra Din 2019 Mumbai Indians Team Wishes: 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. तेव्हापासून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसंच कलाकार, खेळाडूंसह अनेक दिग्गज मंडळी सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना दिसतात. सध्या आयपीएलची देशभरात धूम आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने खास शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांचा व्हिडिओ समोर आला आहे.

पहा व्हिडिओ:

त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाकडून अजून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात मुंबईचा क्रिकेटर सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फला मराठी शिकवत आहे.

पहा व्हिडिओ:

आयपीएल 2019 च्या स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत तर 5 सामन्यात संघाला हार पत्करावी लागली आहे. 14 पाईंट्ससह मुंबई इंडियन्स संघ स्पर्धेत तिसऱ्या स्थानी आहे.