भारतीय राष्ट्रीय क्रिकेट टीम( Photo Credit: X/@BCCI)

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Match Scorecard:  भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील  (Test Series) शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे आणि तिसऱ्या सामन्यात भारताची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खेळाच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडने 27 षटकांत 92 धावा केल्या आणि तीन महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे यांनी डावाची सुरुवात केली. तिसऱ्याच षटकात आकाश दीपने वैयक्तिक 4 धावांवर डेव्हॉन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट करून भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. कॉनवे केवळ 11 चेंडूंचा सामना करू शकला. (हेही वाचा -  IND vs NZ 3rd Test 2024 Live Scorecard: न्यूझीलंडला तिसरा धक्का; सुंदरने घेतला रचिन रविंद्रचा विकेट )

टॉम लॅथमने दुसऱ्या टोकाला राहून संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण वॉशिंग्टन सुंदरने अप्रतिम गोलंदाजी करत 16व्या षटकात लॅथमला बाद करून न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. लॅथमने 44 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. यानंतर रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी काही काळ टिकाव धरण्याचा प्रयत्न केला, मात्र 12व्या चेंडूवर सुंदरने रवींद्रला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रवींद्रने केवळ 5 धावा केल्या आणि 20 व्या षटकात तिसरी विकेट म्हणून बाद झाला.

लंच ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने 27 षटकांत 3 गडी गमावून 92 धावा केल्या होत्या. विल यंग 38 धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे, तर डेरिल मिशेलने 21 चेंडूत 11 धावा केल्या आहेत. आतापर्यंत वॉशिंग्टन सुंदरने 8 षटकांत 26 धावा देत 2 बळी घेत भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वाधिक यश मिळवले आहे. आकाश दीपनेही 5 षटकात 22 धावा देत एक विकेट घेतली.